टेन्ट हाऊस फोडून चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-बेरळी (खु) ता.लोहा येथे साऊंड सिस्टीमचे 1 लाख 90 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरीला गेले आहे.
दिपक शिवाजीराव होळगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजेपासून ते 30 ऑगस्टच्या दुपारी 3 वाजेदरम्यान मौजे बेरळी ता.लोहा येथे त्यांचे चुलते प्रभाकर होळगे यांच्या टेन्ट हाऊसच्या शटरचे दुकान तोडून त्यातून साऊंड सिस्टीमचे 1 लाख 90 हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. पोलीस ठाणे लोहा येथे या प्रकरणी गुन्हा क्रमांक 274/2025 दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरिक्षक सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!