नांदेड – जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर अनुकंपा धारकांची पूर्व अभिलेखे अनुषंगिक बाबी तपासण्यासाठी सोमवार 1 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे सकाळी 11 वा. जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा सामाईक प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिल्ह्यातील राज्य शासनाच्या कार्यालयांतर्गत रिक्त पदांवर 15 सप्टेंबर 2025 रोजी नियुक्ती द्यावयाची आहे. मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या प्रशासनिक सुधारणा कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती याबाबीचा यात समावेश करण्यात आला आहे.
प्रतिक्षाधारक अनुकंपाधारकांची यादी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या़ www.nanded.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या यादीतील, रिक्त पदांवरील नियुक्तीकरिता आयोजित मेळाव्यास त्यांच्याकडील शैक्षणिक पात्रतेविषयीच्या, जातप्रमाणपत्र, रहिवाशी, वारसा या अभिलेख्यांच्या मूळ तसेच छायांकित प्रतिसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
