नांदेड,(प्रतिनिधी)- तालुक्यातील गाडेगाव रस्त्यावर ९१ हजार ३३२ रुपयांची बॅग दुचाकीवरून चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
सूर्यकांत काशिनाथ बोडलवाड (रा. पाटनूर, ता. अर्धापूर) यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ते आपल्या दुचाकीने गाडेगाव मशीदजवळ आले असता त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. दुचाकीला ९१ हजार ३३२ रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लटकवलेली होती. काही क्षणांसाठी ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेले असता, वय अंदाजे २० ते २५ दरम्यान असलेल्या दोघा चोरट्यांनी, ज्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता, बॅग चोरून पळ काढला.या घटनेची नोंद नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा क्र. ८२६/२०२५ अंतर्गत केली आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
