नांदेडला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करा; गणेश अण्णा तादलापूरकर यांची मागणी.

 

नांदेड- उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात जाण्यासाठी मोठा वेळ लागत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी नांदेड शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करावे, अशी मागणी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे राष्टवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश अण्णा तादलापूरकर केली आहे.

राज्यातील मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या नांदेडमध्ये १६ तालुके आहेत. संभाजीनगरला जाण्यासाठी नांदेडहून २७५ किलोमीटर तर जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मांडवी, सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांना ४५० किलोमीटर अंतराचा टप्पा पार करून न्यायालयीन कामकाजासाठी संभाजीनगरला जावे लागते. एवढे अंतर कापून संभाजीनगरला जाण्यासाठी लागणारा वेळ सर्वसामान्यांना परवडणारा नाही. वेळेबरोबरच आर्थिक ताण पडत असल्याने त्रस्त झालेले अनेकजण बऱ्याच प्रकरणात अपील न करता किंवा न्यायालयात न जाता प्रकरणे तिथेच थांबण्याचा निर्णय घेत असल्याने नागरिकांना न्यायापासून वंचित राहावे लागत आहे.

या ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याआधी हिंगोली, परभणी, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील १७५ अंतरावर असलेली आणि लातूर, दोन तासांच्या अंतरावरील न्यायालय जोडल्यास नांदेडसह पाच जिल्ह्यातील नागरिकांना याठिकाणी न्याय मिळण्यासाठी ये-जा करणे सोयीचे होईल. संभाजीनगरला ये-जा करण्यासाठी जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नांदेडला उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी – जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. देविदास इंगळे, ब्लॅक. पँथरचे सचिव निवृत्ती गायकवाड,दलितमित्र कैलास गायकवाड, पीएमकेचे अध्यक्ष ऍड.शिवराज कोळीकर,गोपाळ वाघमारे, विपत्सना सुरडकर,प्रतिमा सुरडकर, सोनाजी कांबळे, अनुसयाबाई कांबळे,डी जी सूर्यवंशी, आर आर हंबीरे आदी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!