
हिंगोली,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पशुधन चोरी प्रकरणाचा हिंगोली पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आणि इतर संशयितांनी मिळून महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातही असे गुन्हे केल्याचे समोर आले आहे.हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या देगलूर नाका परिसरातील तीन वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये चोरी केलेल्या जनावरांची कत्तल करून मांस विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचा खुलासा झाला आहे.शफी बिल्डर हा समाज सेवक पण जांवर चोरी आणि त्यांना कापण्याच्या धंद्यात सहभागी असल्याचे दिसते.
गुन्ह्याची पद्धत उघड
चोरी करणारे आरोपी जनावरांना ‘ गुंगीचे इंजेक्शन’ देतात आणि त्यानंतर त्यांना इनोव्हा, महिंद्रा XUV, स्विफ्ट डिझायर अशा चारचाकी वाहनांमध्ये कोंबून चोरून नेतात. हे पशुधन सोहेल पटेल नावाच्या व्यक्तीकडे नांदेडमधील तीन गोडाऊनमध्ये ठेवले जाते. तिथेच त्यांची कत्तल करून मांसाची विक्री केली जाते.
अशी आहेत आरोपींची नावे
रिजवान इस्तीयाक खान (रा. भिवंडी, ठाणे)
फिरोज मुश्ताक अन्सारी (रा. भिवंडी)
शेख नवी नन्नू (रा. नांदेड)
सय्यद सोहेल पटेल (रा. शिवाजीनगर, नांदेड)
सय्यद फारूक (भाऊ – सोहेल पटेलचा)
शेख जमीर, शेख सलीम, शेख मुर्तुजा, अब्दुल सत्तार (सर्वजण – भिवंडी)
फैजान (सोहेलचा चुलत भाऊ)
अक्रम उर्फ शिवा दादा (पूर्ण नाव अज्ञात)
सय्यद अब्बू पटेल, पीपी सय्यद फारूक (रा. नांदेड)
नूर मोहम्मद कच्ची उर्फ पापा (रा. पनवेल)
शेख अश्रफ (पूर्ण नाव अज्ञात, रा. पालघर)
शेख शफी बागवान उर्फ शफी बिल्डर (रा. देगलूर नाका, नांदेड)
राजू उर्फ शेख शारेक, मोहम्मद भैय्या खान उर्फ गोलू, मोहम्मद शरीफ खान, जम्मू (सर्वजण – रा. नांदेड)
हिंगोली पोलिसांनी ३ आरोपी, तसेच या प्रकरणात १५ लाख रुपये किमतीची चारचाकी वाहन आणि १ लाख ३१ हजार रुपये रोख असा एकूण १६ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंभ घेवारे, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, साईनाथ कंठे, हरिभाऊ गुंजकर, आकाश टापरे, ज्ञानेश्वर गोरे, नरेंद्र साळवे, दत्ता नागरे, प्रदीप झुगरे यांनी सहभाग घेतला.तसेच, अटक करण्यात आलेल्या तिघांना पकडताना नांदेड येथील इतवारा पोलीस ठाण्याचे पो.नि. रणजीत भोईटे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची मदत केली.
‘शफी बिल्डर’चा खरा चेहरा
यापूर्वी शेख शफी बागवान उर्फ शफी बिल्डर याच्यावर नांदेडमध्ये विविध पाच चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती. आता समोर आलेल्या तपासात, तो बैल चोरी करून त्यांची कत्तल व मांस विक्री करणाऱ्या टोळीत सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजसेवक म्हणून वावरणाऱ्या शफी बिल्डरचा हा खरा चेहरा आता उघड झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
