नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील एका तांड्याच्या रस्त्यावर पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला जबर मारहाण करून त्याच्या खिशातील 40 हजार रुपये बळजबरीने लुटल्याप्रकरणी कंधार पोलीसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
धोंडीबा नामदेव राठोड रा.लिंबा तांडा ता.कंधार हे 20 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 ते 8.45 वाजेदरम्यान भोजुवाडी फाटा ते लिंबा तांडा रस्त्यावर असतांना लिंबा तांडा गावातील आकाश सदाशिव राठोड व इतर चार जणांनी मिळून त्यांना काठीने जबर मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील 40 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले आहेत. कंधार पोलीसांनी या घटनेप्रमाणे दरोडा या सदराखाली गुन्हा क्रमांक 293/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक सानप हे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी पोलीसांच्या ताब्यात आहेत.
कंधार तालुक्यात दरोडा
