नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात खून, दरोडा या गुन्ह्यांमध्ये तुरूंगात अससलेल्या तिन आरोपींना उत्तर प्रदेशमध्ये घेवून जाण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यातील जालोन जिल्ह्याच्या कालपी पोलीस ठाण्याचे पोलीस नांदेडमध्ये आले आहेत. सन 2024 मध्ये नांदेडच्या तिघांसह अजून काही जणांनी मिळून उत्तर प्रदेशमध्ये दरोडा टाकलेला आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील पोलीस ठाणे कालपी जि.जालोन येथील पोलीस उपनिरिक्षक प्रविणकुमार आणि त्यांचे सहकारी पोलीस नांदेडच्या न्यायालयात आले आहेत. त्यांना नांदेड जिल्ह्याच्या कारागृहात बंद असलेले आरोपी दिपक भोकरे, शेख आमेर आणि शहबाज मोहम्मद हारुन या तिघांना कालपी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलम 310(2) प्रमाणे गुन्हा क्रमांक 177/2024 साठी तिन गुन्हेगार हवे आहेत. या तिघांसह इतर काही जणांनी मिळून कालपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा दरोडा टाकलेला आहे. आज नांदेडच्या न्यायालयाने या संदर्भाचे पत्र फॉर्म क्रमांक 37 प्रमाणे कारागृह अधिक्षकांना पाठविले आहे आणि तेथे बंद असलेले आरोपी दिपक भोकरे, शेख आमेर आणि शहबाज मोहम्मद या तिघांचा ताबा पोलीस ठाणे कालपी येथील पीएसआय जितेंद्रसिंघ चंदेल यांना देण्यास सांगितले आहे. या पत्रानुसार हे आरोपी ताब्यात घेवून उत्तर प्रदेश पोलीसांनी नांदेड न्यायालयात हजर करायचे आहेत आणि त्यानंतर नांदेड न्यायालय त्यांना उत्तर प्रदेशमधील गुन्हा 177/2024 साठी प्रवास वॉरंट मंजुर करेल.
उत्तर प्रदेशमध्ये दरोडा टाकणारे नांदेडमधील तिन गुन्हेगार घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस नांदेडमध्ये
