नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या भाग्यनगर पोलीसांनी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी शिवसेना नेता मालक असलेला स्पा सेंटरवर धाड टाकली. त्या ठिकाणी पाच जण महिलांकडून अभद्र व्यवहार करायला लावत होते असा आरोप त्या लोकांवर आहे. त्यात स्पा मालक आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातील नांदेड दक्षीणचे युवा जिल्हाप्रमुख अमोदसिंग साबळे आणि स्पाचा व्यवस्थापक तथा सिव्हील इंजिनिअर पंकज जांगीड या दोघांना नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी अटकपुर्व जामीन ना मंजुर केला आहे. आपल्या निकालात न्यायालयाने तपासाच्या प्रक्रियेमध्ये न्यायालयाच्या मर्यादा आहेत. तसेच या दोघांची पोलीस कोठडीतील तपासणी आवश्यक असल्याची नोंद करून अटकपुर्व जामीन अर्ज नामंजुर केला आहे.
2 ऑगस्ट रोजी सायंकाळी शहरातील कॅनॉल रोडवर चालणाऱ्या रेड ओके स्पा-2 वर भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकला. त्या ठिकाणी तीन युवक आणि चार महिला सापडल्या. हे तिन युवक सोबत स्पा सेंटरचा मालक अमोदसिंग तुषारसिंग साबळे (24) व्यवसाय शेती आणि राजकारण तसेच त्या स्पाचा मॅनेजर पंकज मनोज जांगीड (30) व्यवसाय सिव्हील इंजिनिअर असे सर्व जण महिलांकडून अभद्र काम करून घेत होते असा आरोप भाग्यनगरमध्ये दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 445/2025 मध्ये आहे. या संदर्भाने भाग्यनगर पोलीसांनी अगोदर तिन जणांना अटक केली. त्यांना कायदेशीर प्रक्रियेनंतर जामीन मिळाली. पण नेता असलेले अमोदसिंघ आणि मॅनेजर पंकज जांगीड यांनी नांदेड जिल्हा न्यायालयात फौजदारी जामीन अर्ज क्रमांक 696/2025 दाखल करून अटकपुर्व जामीन मागितली.
या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. एम.ए.बत्तुला(डांगे) व पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांनी न्यायालयात सादरीकरण केले की, या दोन अटकपुर्व जामीन मागणाऱ्यांची पोलीस कोठडीतील तपासणी अत्यंत आवश्यक आहे. कारण रेड ओके स्पा हे दुसरा एक मसाज सेंटर आहे आणि त्याची पण तपासणी करायची आहे. म्हणून यांना अटकपुर्व जामीन देऊ नये. आरोपींच्यावतीने ऍड. शिवराज पाटील यांनी सादरीकरण केले. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आपल्या निकालात असे लिहिले आहे की, या दोघांचा या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे पुरावे आहेत. म्हणूनच त्यांची पोलीस कोठडीतील तपासणी अत्यंत आवश्यक आहे. न्यायालयाची तपासाच्या संदर्भाने मर्यादा आहे आणि म्हणून मी या दोघांचा अटकपुर्व जामीन अर्ज नामंजुर करत आहे.
संबंधीत बातमी…
