नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात झालेला लाठीचार्ज हा लाठीचार्ज नव्हता तर ती ठरवून केलेली मारहाण होती असे अनेक व्हिडीओमध्ये दिसत आहे. घटनेच्यादिवशीचे सीसीटीव्ही व्हिडीओ जमा करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती यांच्याकडे होती आणि त्यांना हे माहित नाही की, त्या दिवशीचे दुपारी 2.45 ते पुढेचे सीसीटीव्ही फुटेज कसे कायब झाले आहेत. ज्या सीसीटीव्ही फुटेला सांभाळण्याची जबाबदारी पोलीस विभागाकडेच आहे. लाठीचार्ज झाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड आणि काही पोलीस अंमलदारांनी सोमनाथ सुर्यवंशीसह जवळपास सर्व आरेापींना ताब्यात घेतले आहे.
11 डिसेंबर रोजी विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर त्याचा विरोध झाला आणि या विरोधात अनेक जागी जाळपोळ झाली हा प्रकार 11.30 च्या आसपास घडला. त्यात एका डीपीजळ काही तरी जाळ्यात आले होते. डीपीवर त्याचा प्रभाव पडेल म्हणून लाईट बंद करण्यात आली होती. ती लाईट दुपारी 2.45 वाजता सुरू झाली आणि त्यानंतर झाला लाठीचार्ज मुळात लाठीचार्ज या शब्दाला विस्त्रतपणे पाहिले तर हिंसक जमावाला पांगविण्यासाठी प्रतिहल्ला किंबहुना पोलीसांच्या भाषेतील बळाचा वापर अर्थात लाठीचार्ज होत असतो. वास्तव न्युज लाईव्हकडे उपलब्ध असलेल्या काही व्हिडीओप्रमाणे लाठी चार्ज हा जमावाला पांगविण्यासाठी दिसतच नाही तर ठरवून ठराविक वरूक्तीला मारहाण कर ण्यासाठीच केलेला दिसतो. कारण लाठीचार्ज होत असतांना जमाव हिंसक नाहीच आहे. हिंसक जमावाचा कारभार दुपारी 12 वाजेच्या आसपासच संपलेला आहे.
मग तीन वाजता कसा लाठीचार्ज सुरू होतो. त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि वसमत रोडवरील एका ठिकाणी गडबड झाली. त्या संदर्भाने नवा मोंढा पोलीस ठाण्यात 590 आणि 591 असे दोन गुन्हे दाखल झाले. ते दंगलीच्या संदर्भाने आहेत. त्यात एक आरोपी सोमनाथ सुर्यवंशी पण आहे. या गुन्ह्यांचा तपास सुकर व्हावा म्हणून परभणीच्या पोलीस अधिक्षकांनी चार पथके बनवली. ज्यामध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती यांच्या नेतृत्वातील पथकाकडे त्या दिवशीचे जास्तीत जास्त सीसीटीव्ही फुटेज जमा करण्याची जबाबदारी होती. तसेच इतर तीन पथकांकडे वेगवेगळी कामे होती. याबद्दल पांडूरंग भारती यांनी सीसीटीव्ही फुटेजचा जो अहवााल तयार केला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ तीन शासकीय सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये काहीच कैद झाले नाही असे नमुद आहे. खरे तर पांडूरंग भारती अर्थात पोलीस विभागाकडेच त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी आहे. त्यावर कारण असे सांगितले जाते की, 2.45 वाजता लाईट आली नाही त्यामुळे त्या सीसीटीव्ही कॅमेकऱ्यांमध्ये काही सापडले नाही. पण 2.45 वाजता लाईट पुर्ववत झाली हा अभिलेख आहे. मग काही तरी गडबड येथे आहेच. कोण गायब केले असतील ते फुटेज आणि दोन जिल्ह्यात स्थानिक गुन्हा शाखेत आपल्या कलाकारीमुळे नामवंत असलेल्या पांडूरंग भारती यांना गायब झालेल्या सीसीटीव्हीचा गुन्हेगार शोधता आला नाही. सोबतच खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या-ज्या ठिकााणी लाठीचार्ज झाला त्या-त्या ठिकाणी सुध्दा बऱ्याच जागी सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले आहे. मग ते कोणी केले, ज्यांच्या मालकीचे सीसीटीव्ही आहेत. ते तर बिचारे आज हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आहेत. सोबतच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुध्दा सीसीटीव्ही फुटेज आहे. पण त्या फुटेजची उपलब्धता पोलीस तपासात नाही. एसपी ऑफीस परभणी येथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यांचेही फुटेज उपलब्ध झाले नाहीत. ते सीसीटीव्ही फुटेज उडाले की, उडवले गेले. य ाचा शऱ्या अर्थाने शोध लावला तरच सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूला न्याय देता येईल.
या प्रकरणातील न्यायीक चौकशीनंतर 80 पानांचा अहवाल तयार झाला. तो तर पोलीस विभागाला उशीराच मिळाला. 14 डिसेंबर रोजी पोलीस ठाणे नवा मोंढा येथे सोमनाथ सुर्यवंशी आणि इतरांना आणले त्या आरोपींची एकूण संख्या जवळपास 50 होती. त्यांना जया ठिकाणी बसवले होते. ती जागा 3 ते 4 फुट पेक्षा रुंदीमध्ये मोठी नाही. लांबीमध्ये ही जागा 30 ते 35 फुट असेल. नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही मध्ये मात्र सोमनाथ सुर्यवंशी आणि त्यांचे सहकारी येतांना दिसत आहेत. काही जणांचे कपडे फाटलेले दिसत आहेत. मार लागल्यानतर जसे एका व्यक्ती चालतो तसे ते चालत आहेत.पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी आणलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून तर आणलेलीच नाही. आणि नोंदही केली नाही. नवा मोंढा पोलीसांनी आरोपींची संख्या पाहता त्याच ठिकाणी त्यांच्या वैद्यकीय चाचणीची सोय केली. जवळपास 20-30 सेकंदात त्यांनी वैद्यकीय तपासणी केली. तेंव्हा कोणत्याही आरोपीचे कपडे काढून ती तपासणी झाली नाही. त्यानंतर पोलीस कोठडी संपली आणि न्यायालयीन कोठडीत पाठवतांना पुन्हा एकदा तपासणी झाली. त्यात सोमनाथ सुर्यवंशीच्या कमरेपर्यंतच्या जखमा त्यात दिसत आहेत. त्या वैद्यकीय अहवालात आहेत. पण त्यांना तुरूंगात नेले तेंव्हा तुरूंगातील मार्क रजिस्टरमध्ये सोमनाथ सुर्यवंशीच्या कंबरखाली मांड्या, पेंढऱ्या यावर जखमा असल्याची नोंद तुरूंग पोलीसांनी केली आहे. याचा अर्थ कुठे तरी काळेबेरे आहेच.
संबंधीत बातमी…
सोमनाथ सुर्यवंशीला विना वैद्यकीय चाचणी अशोक घोरबांड यांनी 24 तासानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणले
