नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद भागातील डॉक्टर्सलेन परिसरातून ऍटोमध्ये प्रवास करणाऱ्या रुई(खु) ता.नायगाव येथील एका महिलेची 2 लाख 78 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिमपुर भागात एक कुटूंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी 30 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे.
संगिता संजय बेलकर रा.रुई (खु) ता.नायगाव ह.मु.बोराडेवाडी मोसी ता.हवेली जि.पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 जुलैच्या दुपारी 2.30 वाजेच्यासुमारास महेंद्रकर हॉस्पीटल येथून त्या ऍटो क्रमांक एम.एच.26 एन.4938 मध्ये बसून बस स्थानकाकडे प्रवास करत असतांना त्यांच्या जवळ असलेल्या बॅगमध्ये 2 लाख 51 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे आणि 27 हजार रुपये रोख रक्कम असा 2 लाख 78 हजारांचा ऐवज असलेली बॅग व इतर कागदपत्रे ऍटो चालकाने चोरून नेले आहेत. वजिराबाद पोलीसंानी ही घटना गुन्हा क्रमांक 319/2025 नुसार दाखल केली असून पोलीस अंमलदार सोनटक्के अधिक तपास करीत आहेत.
रहिमपुर येथील जकी बेग लाल बेग मोगल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 जुलैच्या दुपारी 12 ते 22 जुलैच्या रात्री 10 वाजेदरम्यान ते आपल्या कुटूंबासह बाहेरगावी गेले होते. दरम्यान कोणी तरी चोरट्यांनी छतावरून घरात प्रवेश करून घरातील कपाट तोडून त्यातील 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 703/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार गुट्टे अधिक तपास करीत आहेत.
ऍटोमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेची 2 लाख 78 हजार रुपये ऐवजाची बॅग चोरली; बाहेर गावी गेलेल्या कुटूंबाचे घरफोडले
