नांदेड -दिनांक २० जुलै २०२५ रोजी नांदेड च्या हडको बसस्टॉप परिसरातील दत्तकृपा मंगल कार्यालय येथे जगतगुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्या कृपेमुळे आणि कबीर साहेब यांच्या अपार दयेमुळे एक अद्वितीय सत्संग कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमात नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून आणि आसपासच्या परिसरातून हजारो भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. संत रामपाल जी महाराज यांनी आपल्या अमृतमय प्रवचनातून उपस्थित जनसमुदायाला जीवनातील खरे उद्दिष्ट काय आहे, मोक्षप्राप्तीसाठी कोणता योग्य मार्ग आहे, याचे शास्त्र आधारित ज्ञान दिले. अनेक लोकांनी कबीर परमेश्वराची खरी ओळख आणि त्यांची मोक्षदायक भक्ति पद्धत प्रथमच समजून घेतली. कार्यक्रमात मोफत नामदीक्षा घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि शेकडो लोकांनी नामदीक्षा
घेऊन आपल्या जीवनात आध्यात्मिक परिवर्तनाची सुरुवात केली. उपस्थित भक्तांसाठी चहा-बिस्किटची सुविधा करण्यात आली होती. संपूर्ण वातावरण भक्तिभाव, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जा याने भरलेले होते. आयोजकांनी सर्व भक्तगणांचे आभार मानत पुढील काळात असेच शास्त्र आधारित सत्संग नांदेड जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी आयोजित केले जातील, असे सांगितले. शेवटी सर्वांना आवाहन करण्यात आले की, जगतगुरु संत रामपाल जी महाराज यांनी दिलेला खरा शास्त्र आधारित भक्ति मार्ग स्वीकारून आपल्या जीवनात सुख, शांती आणि मोक्षप्राप्ती साधावी, तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रपरिवारालाही या पवित्र ज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करावा. कारण मनुष्य जन्म फार दुर्मिळ असून त्याचा उपयोग परमात्मा प्राप्तीसाठीच व्हायला हवा.
