नांदेड(प्रतिनिधी)-विविध प्रकारच्या रसायनयुक्त, हातभट्टी, देशी दारु अशा व्यसनांच्या व्यवसायांवर नांदेड पोलीस परिक्षेत्राने एकाच दिवशी 19 जुलै रोजी धाड सत्र चालविले. त्यात एकूण 167 आरोपींविरुध्द 167 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मास रेडमध्ये 5 लाख 68 हजार 495 रुपयांची विविध दारु जप्त करण्यात आली आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशाने 19 जुलै रोजी नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांमध्ये हातभट्टी दारु, दारुचे रसायन, देशी दारु आणि शिंदी व्यवसायीकांवर धाडसत्र चालविण्यात आले. यासाठी एकूण 147 अधिकारी आणि 663 पोलीस अंमलदारांनी काम केले. यामध्ये सर्वाधिक मुद्देमाल नांदेड जिल्ह्यात 3 लाख 14 हजार 520 रुपयांचा जप्त करण्यात आला आहे. एकूण 5 लाख 68 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आपल्या भागात सुरू असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अवैध व्यवसायाची माहिती नागरीकांनी संबंधीत पोलीसांना देवून अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठीच्या पोलीसांच्या मोहिमेला हातभार लावावा असे आवाहन पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या चार जिल्ह्यामध्ये 5 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त
