नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेणाऱ्या युवकाला माळाकोळी पोलीसांनी कर्नाटक राज्यातून पकडून आणले आहे.
दि.9 जुलै रोजी माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका वडीलाने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन बालिकेला कोणी तरी पळवून नेले आहे. माळाकोळी पोलीसांनी या प्रकरणी पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा क्रमांक 132/2025 दाखल केला. पोलीसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर त्या अल्पवयीन बालिकेला आणि तिला भुलथापा देवून पळवून नेणाऱ्या युवकाला कर्नाटक राज्यातून पकडून आणले आहे. या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी अश्र्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश मुळीक, गिरीश चामले, पोलीस अंमलदार नदीम डांगे यांचे कौतुक केले आहे.
अल्पवयीन बालिकेला पळवणारा युवक गजाआड
