नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेणाऱ्या युवकाला माळाकोळी पोलीसांनी कर्नाटक राज्यातून पकडून आणले आहे. दि.9 जुलै रोजी माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका वडीलाने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन बालिकेला कोणी तरी पळवून नेले आहे. माळाकोळी पोलीसांनी या प्रकरणी पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा क्रमांक 132/2025 दाखल केला. पोलीसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर त्या अल्पवयीन बालिकेला आणि तिला भुलथापा देवून पळवून नेणाऱ्या युवकाला कर्नाटक राज्यातून पकडून आणले आहे. या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी अश्र्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश मुळीक, गिरीश चामले, पोलीस अंमलदार नदीम डांगे यांचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 969 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शासनाने दारुचे दर वाढविले; 1 लाख 59 हजारांच्या विदेशी दारुची चोरी युवा नेते बंटी लांडगे यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश