नांदेड(प्रतिनिधी)-शासनाने दारुच्या दरात वाढ केल्यामुळे दोन बिअर बार फोडून चोरट्यांनी 1 लाख 59 हजार 340 रुपये किंमतीची विदेशी दारु चोरून नेल्याची घटना बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
दिगंबर दामोधर कल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 जुलैच्या रात्री 10 ते 15 जुलैच्या पहाटे 6.30 वाजेदरम्यान बारड ते मुदखेड रोडवरील पांढरवाडी शिवारातील मराठा बार व हॉटेल तसेच मयुर बार हे दोन बिअर बार फोडून चोरट्यांनी त्यातून 1 लाख 59 हजार 340 रुपये किंमतीची विदेशी दारु चोरून नेली आहे. बारड पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 91/2025 प्रमाणे दाखल केेली असून तपास पोलीस उपनिरिक्षक सुदाम आडे हे करीत आहेत.
शासनाने दारुचे दर वाढविले; 1 लाख 59 हजारांच्या विदेशी दारुची चोरी
