नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांनी 14 जुलै रोजी रात्री मारहाण केल्यामुळे एका युवकाचा हात फॅक्चर झाला आहे. एक पोलीस अंमलदार त्या ठिकाणी हजर होता. ज्याला फिर्यादी ओळखतो म्हणजे मारहाणीचा साक्षीदार सुध्दा पोलीस अंमलदार आहेच. पोलीस अधिक्षकांकडे ही तक्रार आज देण्यात आली आहे.
गोविंदनगर वळण रस्ता नांदेड येथे राहणारे गोविंद आनंदा कदम हे 14 जुलै रोजी रात्री 10 ते 11 वाजेदरम्यान आपल्या घरून डॉक्टर्सलेन येथे औषधी गोळ्या आणण्यासाठी जात असतांना रेल्वे स्थानकासमोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काही पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार उभे होते. त्यातील एक पोलीस अंमलदार बालाजी सातपुतेने आणि दुसऱ्या एकाने माझी ओळख असल्यामुळे मला आवाज दिला. मी परत गेलो. तेंव्हा पोलीस निरिक्षक कदम यांनी मला काही न विचारता मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पोलीस अंमलदार बालाजी सातपुते, पोलीस निरिक्षकांना म्हणाला की, माझ्या ओळखीचा असून मी त्याला थांबवले आहे. तरी कदम साहेबांनी मला मारहाण सुरूच ठेवली. शिवीगाळ केली. मी माझी काय चुक आहे असे विचारत असतांना माझ्या दोन्ही पायांवर, हातांवर, गुडघ्यांवर, पिंडऱ्यांवर त्यांच्याकडे असलेल्या दांड्याने मारहाण केली. मी पोलीस ठाणे वजिराबाद येथे तक्रार देण्यासाठी जात आहे असे सांगितल्यानंतर मला गाडीत टाकून वजिराबाद पोलीस ठाण्यात आणले आणि मला काही कागदांवर सह्या करायला सांगितल्या. त्यावेळे सुध्दा सह्या करणार असे सांगितलो. तेंव्हा बालाजी सातपुतेने मला तेथून बाहेर काढले. मी रात्रीच पोलीस अधिक्षक कार्यालयात तक्रार देण्यासाठी आलो तेंव्हा पोलीस अंमलदार राजू पांगरेकर यांनी मला फोन लावून सरकारी दवाखान्यात पाठविले. सरकारी दवाखान्यात माझ्या डाव्या हातावर प्लास्टर लावण्यात आले आहे. तुझे दोन दिवसात ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. त्यानंतर मला पोलीसांनी फोन करून आमच्यावर कार्यवाही केलीस तर तुला खोट्या गुन्ह्यात फसवू असे धमक्या देत आहेत. मला मारहाण करून दुखापत करणाऱ्या पोलीस निरिक्षक कदम यांच्यावर योग्यती कायदेशीर कार्यवाही करावी असे या अर्जात लिहिले आहे. गोविंद आनंदा कदम यांच्या सांगण्याप्रमाणे ज्या ठिकाणी मला मारहाण झाली. त्या ठिकाणी बरेच सीसीटीव्ही कॅमेरे होते. मला मारहाण झालेली घटना त्या सीसीटीव्ही कॅमऱ्यांमध्ये कैद झाली असणारच.
पोलीस निरिक्षक कदम यांनी मारहाण करून युवकाचा हात फॅक्चर केला-पोलीस अधिक्षकांकडे तक्रार
