नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील दोन पोलीस निरिक्षकांना आदलाबदली करून नियुक्ती देण्यात आली आहे. हे आदेश 4 जून रोजी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जारी केले आहेत.
नांदेडमधील सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धिरज दत्तात्रय चव्हाण यांना पोलीस ठाणे मुदखेड येथे पाठविण्यात आले आहे. तसेच मुदखेड येथील पोलीस निरिक्षक वसंत जगन्नाथ सप्रे यांना सायबर पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले आहे. सध्या तरी पोलीस निरिक्षकांच्या संवर्गात या दोन पोलीस निरिक्षकांनाच आदलाबदली करून नियुक्ती देण्यात आली आहे.
सायबर पोलीस ठाणे आणि मुदखेड पोलीस ठाण्यात आदलाबदली
