सध्याच्या परिस्थिती हिंदु-मुस्लिम पध्दतीचे विष पसरविण्याचा धंदा सुरू असतांना लल्लन टॉप या चॅनला मुलाखत देतांना प्रसिध्द गितकार जावेद अख्तर म्हणाले. औरंगजेब आणि बॅरिस्टर जिन्ना हे जातीयवादी म्हणण्यापेक्षा स्वत:च्या फायद्यासाठी काय प्राप्त होते असेच बघणारे होते. म्हणून त्यांनी कट्टरवादी मुस्लिमांना एकत्र करून इतवारांना त्रास दिला. याच संदर्भाने बोलतांना जावेद अख्तर म्हणाले बादशाह शाहजहान याच्या धमन्यांमध्ये 75 टक्के रक्त राजपुतांचे होते. हे सांगतांना त्यांनी सांगितले की, राजशाही काळातील गुप्तकाळ, मौर्यकाळ आणि मोगल काळ यामध्ये गुप्त आणि मौर्यकाळाबद्दल जनतेला जास्त माहितच नाही आणि जे माहित आहे ते सर्व बरोबर आहे. परंतू मोगल काळाबद्दल लोकांकडे किंबहुना जनतेकडे जी माहिती आहे ती चुकीची आहे असे जावेद अख्तर यांना वाटते.
सध्या भारतात हिंदु-विरुध्द मुस्लिम असे विष पेरण्याचे एक मोठे षडयंत्र सुरू आहे. पर्वाच विदेशात गेलेल्या शिष्टमंडळासोबत एमआयएमचे खासदार असदोद्दीन ओवेसी यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टीची मंडळी अत्यंत सुंदर शब्दांमध्ये वर्णन करत होती. ओवेसी हे भारताचे प्रतिनिधी होते म्हणून त्यांनी बोलले ते अत्यंत योग्य होते आणि परदेशात गेलेल्या खासदारांमध्ये ते हिरोच ठरले. परंतू ते शिष्टमंडळ परत आले आणि भारतीय जनता पार्टीला खासदार ओवेसींचा विसर पडला आणि पुन्हा सुरू झाले विष पसरविण्याचे काम.
या संदर्भानेच प्रसिध्द गितकार जावेद अख्तर यांची मुलाखत लल्लन टॉपने घेतली. या मुलाखतीत याच विषयाची चर्चा करतांना जावेद अख्तर म्हणाले औरंगजेब आणि बॅरिस्टर जिन्ना यांच्यामध्ये कोणतीही आदर्श आचार संहिता नव्हती. जेंव्हा खिलाफत मुव्हमेंट झाली होती तेंव्हा जिन्नाने महात्मा गांधींना त्यात का सहभागी होता, त्याला का पाठबळ देता असे सांगितले होते. 7 वर्ष इंग्लंडमध्ये वकीली करून आल्यानंतर स्टार बनण्याच्या नादात त्याने आपली दुकानच वेगळी थाटली. औरंगजेब सुध्दा असाच काही होता. त्याने मंदिरे पाडले, त्याने मंदिरांचे नुकसान केले, हत्या केल्या याला नाकारता येत नाही. परंतू त्याने ज्या पध्दतीने राज्य मिळवले होते ते टिकवण्यासाठी त्याला कट्टर मुस्लिमांना एकत्र करावे लागले आणि मंदिरे पाडून त्याने दहशत तयार केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली 23-27 पत्रे उपलब्ध आहेत. त्यातील एका पत्रामध्ये छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रात सांगितले आहे की, जनतेला नाराज करून कोणताही राजा यशस्वी होवू शकत नाही. आता मोगल काळ संपला आहे आणि तुझ सुध्दा शेवट जवळ आला आहे. याच पत्रात त्यांनी औरंगजेबचे आजोबा जलालुद्दीन अकबर यांच्याबद्दल जगतगुरू असा उल्लेख केलेला आहे. म्हणून फक्त औरंगजेबाचे चरित्र पाहुन आज त्या जातीच्या लोकांना प्रश्न विचारणे याबाबीला दु:ख वाटते असे जावेद अख्तर म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचा उल्लेख करत जावेद अख्तर म्हणाले की, ते मुळ केनियामधील आहेत. त्यांचे वडील केनियाचे आहेत. त्यांच्या आई अमेरिकेच्या आहेत आणि त्यांचा जन्म अमेरिकेत झाला. म्हणून त्यांना अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. आजही बराक ओबामाच्या अनेक आत्या केनियामध्ये जिवंत आहेत. भारतात मोगलांचा प्रवेश हा बाहेरून झाला. बाबर हा समरकंदहुन आला आणि काबुलमध्ये कबरीत पाठविला गेला. खरा मोगल काळ हुमायुनंतर अकबराच्या काळात सुरू होतो. ग्रेड रुलर टाईम्स मॅग्झीनने लिहिले होते की, जगातील दहा सर्व श्रेष्ठ समाजवादी कोण आहेत. त्यामध्ये भारताच्या बादशाह अकबराचे नाव आणि महात्मा गांधींचे नाव लिहिलेले आहे. अकबराने नलदमयंती या नाटकाचे भाषांतर पार्शी भाषेत केले होते. अकबरांनी ख्रिचन, हिंदु यांच्याही बैठका एकत्रित घडवल्या होत्या आणि सर्व धर्मीय लोकांनी एकत्र राहतात येईल काय यावर चर्चा घडविल्या होत्या. त्यांच्याच काळात उत्तर भारतात पहिला चर्च आगरामध्ये बनविण्यात आला. अकबराला मुराद, दानियाल आणि सलीम अशी तिन मुले होती. त्यातील मुरादने आपले वडील अकबर विचारले होते मला अशी पुस्तक द्या की जी पुस्तक वाचून मी जग पुर्णपणे समजून जाईल. त्यावेळी अकबरांनी त्याला महाभारत हा ग्रंथ भेट दिला होता आणि सांगितले होते की, हा ग्रंथ समजून घेतला तर जगात तुला काही समजण्यासारखे शिल्लक राहणार नाही.
जावेद अख्तर सांगत होते की, अकबराचे सरसेनापती मिर्झा मानसिंह होते. त्यांच्या मंत्री मंडळात तोडरमल होते. मोगल काळात भारत एवढा श्रीमंत होता की, आज त्यांच्याबद्दल वाईट शब्द ऐकून दु:ख होते. याचे उदाहरण सांगतांना इंग्लंडच्या राजाने जहांगीरच्या काळात टॉमस रो नावाचा एक व्यक्ती भारतात पाठविला होता आणि भारतात काय व्यापार करता येईल याची चाचपणी करण्यास सांगितले होते. जहांगीर सुध्दा दारु पिण्याच्या सवईचा होता आणि टॉमस रोला सुध्दा ते आवडायचे म्हणून दोघांची गट्टी चांगलीच जमली. परंतू टॉमस रो परत गेल्यावर राजांना लिहिले ते पत्र आजही इंग्लंडमध्ये इंडिया ऑफीसमध्ये पाहायला मिळते. त्या पत्रात त्यांनी लिहिले होते की, भारताच्या राजांनी आम्हाला व्यापाराची परवानगी दिली तरी आम्ही त्यांना काय विकणार. सरासरी इंग्रज माणसांपेक्षा भारताचा सरासरी नागरीक खुप चांगल्या राहणीमानाचा आहे. ही बाब 400 वर्षांपुर्वींची आहे आणि लोक त्यांना लुटारू म्हणतात याचे मला दु:ख वाटते असे जावेद अख्तर म्हणतात.
अकबराची राणी हरकाबाई यावेळी ते सांगतात जोधाबाई हे नाव फिक्टीशियस आहे. त्यांचा मुलगा सलीम, सलीमचा पुत्र शाहजहान त्याच्या आईचे नाव जगतगोसाई या दोन समिकरणांवरुन जावेद अख्तर सांगत होते की, शाहजहानच्या धमन्यांमध्ये वाहणारे 75 टक्के रक्त राजपुतांचे होते. हुमायुची पत्नी हमीदाबानो अर्थात अकबरांची आई आगरामध्ये त्या दोघांच्या कबरी एकाच जागी आहेत. जहांगिरची पत्नी नुरजहा लाहोरमध्ये त्यांची कबर आहे आणि शाहजहानच्या पत्नीची कबर ताजमहलमध्ये आहे. औरंगजेबाच्या पत्नीची कबर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे ज्याला बीबीका मकबरा असे म्हटले जाते. पण ईतिहासाला खंगाळतांना अकबरची राणी हरकाबाई आणि शहाजहानची आई अर्थात सलीमची पत्नी जगतगोसाई यांच्या कबरी कोठे आहेत. यात हरकाबाईच्या नावाने प्रयागराज जवळच्या एका गावात छत्री असल्याचे जावेद अख्तर सांगत होते. छत्री त्या जागी बनवले जाते. ज्या जागी त्या व्यक्तीच्या चितेला अग्नी दिला गेला. ज्या राजांनी या हरकाबाई आणि जगतगोसाई यांच्या मुलांना भारताचे राजा बनवले. त्यांचेच धर्मांतरण केले नाही. मग तलवारीच्या जोरावर इस्लाम पसरविला या आरोपा ऐकून मनात दु:ख होते असे जावेद अख्तर म्हणाले. वाचकांनो जावेद अख्तरचे मत आणि आज सुरू असलेली परिस्थिती याबद्दल आपले काय विचार असतील नक्कीच विचार करा आणि त्यांना प्रसारीतपण करा.
मोगल काळाबद्दल जगाला माहित असलेली परिस्थिती चुकीची आहे-जावेद अख्तर
