एएनआय भिती दाखवून युट्युबर्सकडून लाखो रुपये उकळत आहे

रोजच्या घटनांवर माहिती देणाऱ्या युट्युबर्सनी एखादा काही सेकंदाचा व्हिडीओ वापरला तरी एएनआय ही संस्था तो व्हिडीओ आमचा आहे असे म्हणून त्यांच्या चॅनेलला स्ट्राईक करत आहे. हा अधिकार युट्युबने त्यांना दिलेला आहे. हा अधिकार तसा सर्वांकडेच असतो. पण बातम्यांचा धंदा करतांना एएनआयने त्याच्या मर्यादा पाळलेल्या नाहीत. कॉपीराईट कायदा 1957 प्रमाणे क्रियेटीव्ह कामासाठी हा वापरता येतो आणि अगोदरच त्याची नोंदणी करावी लागते. परंतू 1971 पासून सुरू असलेल्या या एएनआयने अगोदर कॉंगे्रस सरकार आणि नंतर भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आपले वजन वाढविल्यामुळे हा प्रकार घडत आहे. यात एका नामांकित युट्युबरने 50 लाख रुपये दिल्याची प्रसिध्दी सुध्दा एएनआय संस्था करत आहे.
काही दिवसांपुर्वीद्य मोहक मंगल या युट्युबरने तयार केलेल्या एका व्हिडीओमधील फुटेज संदर्भाने एएनआयने त्यांना दोन स्ट्राईक दिले. त्यानंतर ईमेलवर बोलणे झाले आणि ईमेलवरच एएनआयने मोहक मंगलकडून 45 लाख रुपयांची मागणी केली आणि सांगितले की, अमुक एका मोठ्या युट्युबरने आम्हाला 50 लाख रुपये दिले आहेत. कोणत्याही चॅनलने चुकीचे कृत्य केले तर किंवा दुसऱ्याच्या मालकीचे फुटेज वापरले तर युट्युबकडे स्ट्राईक देण्याचा अधिकार आहे. कारण युट्युब कोणत्याही पचड्यात फसू इच्छीत नाही. आपण म्हटले की, हे आमच्या मालकीचे आहे तर युट्युब त्याची शाहनिशाह करत नाही. दोन स्ट्राईक आल्यानंतर ते चॅनेल काही काळासाठी बंद होते. परंतू तीन स्ट्राईक आले तर ते चॅनल कायम बंद केले जाते.
1971 मध्ये प्रेमप्रकाश या छायाचित्रकाराने एशियन न्युज इंटरनॅशनल नावाची ही एएनआय संस्था स्थापन केली. अगोदर कॉंगे्रस सरकारमध्ये सुध्दा त्यांचे वजन होते. पुढे त्यांच्या एका पुत्राने दुरसंचार विभागाच्या संचालकाच्या मुलीशी विवाह केला आणि त्यांची शासकीय प्रभावाची क्षमता वाढली आणि याच क्षमतेवर आजही ते बातम्यांचा धंदा करत आहेत. देशभरात कोठेही एएनआयचे प्रतिनिधी नाहीत. परंतू देशभरात मुक्तपणे पत्रकारीता करणाऱ्या सर्व स्ट्रींजरकडून ते 1000-1500 रुपयांमध्ये त्या भागातील बातम्यांचे फुटेज खरेदी करतात आणि ते इतर वृत्त संस्थांना लाखो रुपयांना विकतात. आता त्यांनी खरेदी केले आहे तर ते त्यांच्या मालकीचे झाले. परंतू एखाद्या चॅनलवर चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये दोन लोकांमध्ये हाणामारी झाली तर ते काही सेकंदांचे फुटेज विश्लेषण करणारा युट्युबर वापरेल. हे फुटेज आमचेच आहेत असे म्हणून एएनआय त्यावर क्लेम करते. काही पत्रकार परिषदा लाईव्ह असतात. त्या पत्रकार परिषदा आपण स्वत: कट करून घेतल्या आणि वापरल्या त्यावर सुध्दा एएनआय आपला हक्क सांगते. अशा पध्दतीने युट्युबर्सकडून लाखो रुपयांची वसुली करण्याचा धंदा एएनआय जोरदारपणे करत आहे. कारण ही एजन्सी शासनाच्या जवळची आहे.
ज्या कॉपी राईट ऍक्ट आधारावर एएनआय युट्युबर्सला स्ट्राईक देवून त्यांचे चॅनल बंद पाडत आहे आणि लाखो, करोडो रुपयांची वसुली करत आहेत. त्या कायद्याची व्याख्या आम्ही वाचकांसाठी देत आहोत. कॉपी राईट कायदा 1957 मध्ये तयार झाला. त्यात तुम्ही तयार केलेल्या कोणत्याही उत्पादनाची नोंदणी करावी लागते आणि तेच उत्पादन कोणी इतराने वापरले तर त्यावर हा कायदा लागू होतो. याची उदाहरणे अशी आहेत की, कोणी लिहिलेले पुस्तक, लेख, संगणक कार्यक्रम, नाटक, स्क्रिन प्ले, संगित आणि आटर्‌रीस्टीक वर्क अशा बाबी येतात. क्रियेटीव्ह वर्क म्हणजे आपण स्वत: मेहनत करून, भरपूर वेळ देवून, भरपूर पैसे खर्च करून केलेले काम. एएनआय ज्या व्हिडीओ फुटेजवर आपला हक्क सांगते ते त्यांचे क्रियेटीव्ह वर्क नाही. पाकिस्तानने व्हायरल केलेले व्हिडीओ सुध्दा ते आपलेच आहेत असे म्हणतात, पत्रकार परिषदांचे फुटेज आमचेचे आहेत असे म्हणतात. एखादा नेता बाईट देत असेल तर त्या ठिकाणी 10 ते 15 माईक असतात. ते बाईट भारतीय जनतेला माहिती होणे आवश्यक आहे. एएनआयने ते बाईट घेतलेले नसतात. परंतू शासनाच्या दरबारी त्यांचे वजन पाहुन शासन सुध्दा फक्त त्यांनाच परवानगी देते. म्हणून कोठे-कोठे एएनआयचे माईक दिसतात. अशा बाईटचा धंदा करतांना त्या बाईटची तुलना सलमान खान, अजय देवगण, शाहरुख खान यांचे चित्रपट किंवा कल्याणजी आनंदजी, अजय-अतुल यांनी तयार केलेल्या संगिता सोबत करता येत नाहीत. अनेक जागी एएनआय फुकटात फुटेज मिळवते आणि आपला ठप्पा मारुन युट्युबर्सला पकडते. कारण युट्युब खरे काय आणि खोटे काय याची तपासणीच करत नाही.
एखादी फेअर न्युज दाखवतांना म्हणजे एखाद्या घटनेची समिक्षा करतांना त्या संदर्भाची व्हिडीओ फुटेज कोणी दाखवणे, कॉपीराईट कायद्यामध्ये येत नाही. कारण त्या फुटेजच्या मालकीची नोंदणी अगोदर करावी लागते अशी नोंदणी कोठेच नाही. मोहक मंगलने पैसे तर दिलेच नाहीत. क्रियेटीव्ह या शब्दाखाली तयार झालेला व्हिडीओ असेल तर नक्कीच तो कॉपीराईट ऍक्टखाली येईल. भिती दाखवून एएनआय आपल्या सेवा इतरांना घेण्यासाठी बाध्य करत आहेत अशी आजची परिस्थिती आहे. भुतकाळात वापरलेल्या व्हिडीओ फुटेजला सुध्दा स्ट्राईक देता देतो. यामुळे युट्युबर्सच्या अस्थितत्वाला धोका तयार झाला आहे. याला असे म्हणता येईल की, कोंबडा चोरणाऱ्याला फाशीची शिक्षा होत आहे. तसेच 1 ग्रॅम गांजा सापडला तर त्याला 10 वर्षाचा तुरूंगवास भोेगावा लागत आहे. हे सर्व सरकारच्या संरक्षणात होत आहे. कारण एएनआय ही सरकारची समर्थक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!