नांदेड,(प्रतिनिधी)-अशोका विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक अली खान मेहबूबाबाद यांना अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना अनेक शर्ती लावल्या आणि त्या आदेशात उल्लेखित केलेले भाषण मात्र भविष्यासाठी घातक आहे असे दिसत आहे. जय हिंद लिहून आपल्या फेसबुक पोस्टचा शेवट करणाऱ्या प्राध्यापक अली खान आणि त्यांच्या विभागातील विद्यार्थ्यां बद्दल न्यायमूर्तींनी केलेले उल्लेख मात्र भविष्यात आमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे, असे म्हटले तर चूक ठरणार नाही. ज्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ताशेरे लिहिले आहेत. ते पुढचे भारताचे सरन्यायाधीश होणार आहेत आणि त्यांचा कार्यकाळ सुद्धा बराच लांब आहे. म्हणून आजच त्यांनी दिलेल्या निर्णया संदर्भाने बोलताना नागरिकांना भीती वाटण्याची आवश्यकता आहेच.

7 मे रोजी अशोका विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक अली खान मेहबूबा बाद यांनी फेसबुक वर लिहिलेला एक पोस्ट देशाच्या विघातक आहेत अशा स्वरूपाची कलमे जोडून त्यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी 24 तासात त्यांना अटक केली. त्यांचा पोलीस कोठडी रिमांड पण घेतला. पण तपास दरम्यान काहीच प्रगती झाली नाही म्हणून न्यायालयाने त्यांना काल न्यायालयीन कोठडीत पाठवले. आज त्यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना तो दिसला पाहिजे. त्यांच्या भाषणाची त्यांच्या संदेशाची जनतेला गरज नाही. या निर्णयात त्यांनी दिलेले संदेश अत्यंत घातक वाटत आहेत. जे भविष्यात भारतीय नागरिकांच्या बोलण्याच्या स्वातंत्र्याला हिरावून घेणारे आहेत.अली खान यांनी लिहिलेल्या पोस्ट संदर्भात एका महिला अंकर ने हरियाणाच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रेणू भाटिया यांना 11 मिनिटाच्या पाड कास्ट मध्ये अनेक वेळेस विचारले की अली खानने महिलांची देशाची,महिलांची बेअब्रू केलेले दोन वाक्य सांगा ज्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रेणू भाटिया काहीच बोलू शकल्या नाहीत. मला इंग्रजी येत नाही तुम्हीच मला सांगा असे अँकरला म्हणाल्या, कारण अली खान यांनी केलेली पोस्ट इंग्रजी मध्ये होती. विशेष म्हणजे आपल्या पोस्टचा शेवट त्यांनी जय हिंद या शब्दा सोबत केला होता. रेणू भाटिया त्याच आहेत ज्यावेळी हिमांशी नरवाल वर अत्यंत घाणेरड्या शब्दात ट्रोलिंग होत होते तेव्हा त्यांना काहीच आठवले नाही काय? त्यावेळेस त्यांना गुन्हा दाखल करायचे कळले नाही काय?ठीक आहे हिमांशी नरवाल देशाची मुलगी नसेल, ती शहीद सैन्य अधिकाऱ्याची पत्नी नसेल म्हणून त्यांनी असे केले काय? हा ही प्रश्न या निर्णयाने समोर आला आहे. परंतु देशात असलेल्या डॉगी मीडिया आणि गिध्द्द मीडिया देशात दररोज हिंदू मुस्लिम असे विष पसरवतात त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. पण न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. के.सिंह यांनी आज दिलेला निर्णयामुळे भविष्यासाठी हा धोकादायक संदेश नक्कीच आहे.

अली खान यांनी दोन महिला अधिकाऱ्यांना समोर करून देशात बरोबरी दाखवली जात आहे परंतु सत्य काही वेगळे आहेत हे लिहीत असताना पाकिस्तानला भरपूर शिव्या दिलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल वाईट लिहिलेले आहे पण तरी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. युद्धामुळे राजनीतिक समस्या सोडवता येत नाहीत, गरिबांचे नुकसान होते आणि कंपनीचा फायदा होतो असे अली खान यांनी लिहिले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते मंत्री कुवर विजय शहा यांनी सोफिया कुरेशीला अतिरेक्यांची बहीण म्हटले त्यावर कार्यवाही उच्च न्यायालयाने सो मोटो केली असताना याच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठने त्यांना जामीन दिला. मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी भारतीय सैन्याने नरेंद्र मोदी यांच्या चरणावर नतमस्तक व्हावेत असे म्हटल्यानंतर त्यांच्यावर काही कार्यवाही झाली नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टी देशाशी प्रेम करते, सेनेशी प्रेम करते, ती राष्ट्रवादी पार्टी आहे. पण अली खानने काही लिहिले तर तो देशद्रोही होतो म्हणजे त्याचे मुस्लिम समाजात जन्म घेणेच हा दोष देशद्रोह आहे का अली खानने भारताचा तिरंगा ध्वज हातात घेऊन काढलेल्या रॅलीचे फोटो उपलब्ध आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट ला सुद्धा अशोका विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्राध्यापकाच्या सोबत उभे राहून काही चूक केली नाही.अत्यंत शांततेत ते आपल्या प्राध्यापकाच्या पाठीशी आहेत आणि का राहू नये, काय चुक लिहिले अली खानने याचा उल्लेख तक्रारदाराला सुद्धा करता आला नाही. म्हणूनच आमच्या नैतिक अधिकाऱ्यांवर जे आम्हाला संविधानाने दिले आहेत त्यावर गदा येणार आहे असे आम्ही म्हणत आहोत. देशातील नागरिकांना मिळालेले लोकतांत्रिक अधिकार ही कोणी दिलेली भीक नाही तर आमच्या पूर्वजांनी इंग्रज सरकार विरुद्ध लढून त्यांच्याकडून अर्जित केलेले आहेत. ते अधिकार आमच्या संविधानात लिहिलेले आहेत. न्यायव्यवस्थेला सुद्धा आठवण ठेवायला हवी की दोन मुख्य निवडणूक आयुक्त भारतात झाले एक टी. एन. सेशन आणि दुसरेच राजीव कुमार कोणत्या पद्धतीत आपली प्रतिष्ठा भारतीय जनतेला दाखवायची आहे याबद्दलचा विचार न्यायव्यवस्थेला करण्याची गरज आहे.

