विदेशमंत्री एस.जयशंकर यांचे वक्तव्य मुखबिरी

भारतीय जनता पार्टीचे नेते, त्यांचे प्रमुख भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहानपणी मगर पकडली होती असे सांगून त्यांचे शौर्य सांगतात आणि आजची परिस्थिती अशी आहे की, ट्रम्पच्या सांगण्यावरून भारत-पाकिस्तानमध्ये युध्द विराम झाला याबद्दल बोलायची हिम्मत सुध्दा नरेंद्र मोदीमध्ये नाही. यासोबतच विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांनी काही प्रश्न सरकारसमोर उपस्थिती केले आहे. त्या प्रश्नांची उत्तरे अद्याप देण्यात तर आलीच नाहीत. पण भारतीय जनता पार्टीमध्ये आणि केंद्र शासनामध्ये स्मशान शांतता पसरली आहे. कॉंगे्रसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी तर पत्रकार परिषद घेवून विदेशमंत्री एस.जयशंकर यांनी पाकिस्तानला हल्याच्यापुर्वी माहिती देवून मुखबिरी केल्याचे सांगितले आहे. हा देशद्रोहच आहे असे पवन खेडा सांगतात. पण एस.जयशंकर यांनी हल्याच्या सुरूवातीला असे शब्द वापलेले आहे आणि पवन खेडा यांनी हल्याच्यापुर्वी असे शब्द वापरले आहेत. या दोन्ही शब्दांमध्ये भरपूर मोठा फरक आहे आणि त्या फरकाला वाचकांनी प्रत्यक्षात विचार करायचा आहे की,काय खरे आहे.
भारत-पाकिस्तानमधील युध्द विरामाची घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांनी केली. एकदाच नव्हे तर त्यांनी सहा वेळेस असे केले. त्यांनी हवेत विमानात सुध्दा मुलाखत देतांना सांगितले. सर्वात मोठा आरोप असा आहे की, अणूयुध्द होवू शकले असते म्हणून मी ते युध्द थांबवले. भारताच्या सैन्याने आपली कामगिरी सांगतांना नुरखान एअरबेसवर हल्ला केला होता असे सांगितले. तेथेच पाकिस्तानचा परमाणु साठा आहे. मग परमाणू युध्द होणार कोठून, धोका देवून असे सांगण्यात येत आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. खा.राहुल गांधी सरकारला प्रश्न विचारतात किती विमानांचे नुकसान झाले. याचे उत्तर सरकारने अद्याप दिलेले नाही. युध्दा संदर्भाने सरकारने एक शब्द सुध्दा सांगितला नाही. जे काही सांगितले ते सैन्याच्यावतीने सांगण्यात आले आणि त्या सैन्यावर सुध्दा भारतीय जनता पार्टीचे नेते चुकीचे शब्द वापरून आरोप करत आहेत. विवेक काडजू हे सुरक्षा तज्ञ विचारतात पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचे काय झाले. त्यांच्याविरुध्द काय कार्यवाही झाली. का हल्ला केला पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणावर याचे सुध्दा काही उत्तर नाही. 22 एप्रिल रोजी पहलगामचा हल्ला झाला आणि तेंव्हापासूनच युध्दाची परिस्थिती तयार झाली. भारतीय विमानांनी भारताची हवाई सिमा सोडून पाकिस्तानच्या हवाई सिमेत प्रवेश न करता आतंकवादी ठिकाण नष्ट केले. विदेश मंत्री एस.जयशंकर यांनी सांगितले की, हल्याच्या सुरूवातीला आणि कॉंगे्रस सांगते हल्याच्यापुर्वी या दोन्ही शब्दांमध्ये खुप मोठा फरक आहे. परंतू 22 एप्रिलपासूनच युध्द परिस्थिती तयार झाली होती. म्हणजे पाकिस्तानचे सैन्य सुध्दा उत्तर देण्यासाठी तयार होते. शेवट काय झाला असता देवच जाणे. परंतू त्यांनी तयारी ठेवली नसेल असे म्हणता येणार नाही. वाचकांनी या संदर्भाने विचार करून हे ठरवायचे आहे की, हल्याच्या सुरूवातीला आणि हल्याच्या पुर्वी यातील कोणता शब्द आपण अंगीकारायचा आहे.


कुवर विजय शाह या मध्यप्रदेशच्या मंत्र्याला सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढत तो किती चुकीचा आहे, त्याचे शब्द किती चुकीचे आहेत, त्याने सैन्याच्या संदर्भाने वापरलेले शब्द आहेत आणि त्याला जर दिलासा दिला तर सर्वसामान्य लोकांमध्ये चुकीचा समज जाईल असा त्या ताशेऱ्याचा आशय आहे. परंतू त्याला अटकेपासून सर्वोच्च न्यायालयाने वाचवले आहे. दुसरीकडे अशोका विद्यापीठाचे प्रा.अलीखान महेबुबाबादी यांनी काही प्रश्न देशासंदर्भाने विचारल्यावर त्यांच्याविरुध्द लखनऊ पोलीसांनी गुन्हा दाखल केला. त्याची तक्रार हरीयाणा महिला आयोग आणि एका बीजेपी नेत्याने दिली होती. प्रा.अलीखान हे सध्या तुरूंगात आहेत. म्हणजे दोन वेगवेगळ्याप्रकरणात दोन वेगळे न्याय दिले जात आहेत. हा मुद्दा आम्ही वाचकांसाठी या संदर्भाने मांडत आहोत. वाचकांनी ठरवायचे आहे की, कुवर विजय शाहला दिलेला न्याय बरोबर आहे की, प्रा.अली खान यांना दिलेला न्याय बरोबर आहे.


भारतीय जनता पार्टीने एक नवीन मार्केटींग सुरू केली आहे. ती मार्केटींग रेल्वे तिकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो ऑपरेशन सिंदूरच्या यशाला जोडून छापला गेला आहे. अशी मार्केटींग कोविड काळात सुध्दा झाली. त्याही वेळेस खा.राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला होता. मोदींनी तर खताचे थैले, बालकांचे बॅग, धान्याचे पोते यांच्यावर सुध्दा आपले फोटो छापले. याबद्दल सुप्रिया श्रीनेत यांनी फोटो बहाद्दर असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केला आहे.


सुप्रिया श्रीनेत आणि पवन खेडा या कॉंगे्रस नेत्यांचे वक्तव्य पुर्वी पाकिस्तान टी.व्ही.ने दाखवले होते. तेंव्हा त्यांना भारतीय जनता पार्टी देशद्रोही म्हणून लागली. आज विदेशमंत्री एस.जयशंकर यांचा व्हिडीओ पाकिस्तानमधील टी.व्ही. दाखवत आहे. नजमशेटी या पाकिस्तानी पत्रकाराने टी.व्ही.वर मुलाखत देतांना सांगितले की, जर त्यांनी सांगितले होते तर पाकिस्तानात सर्व तयारी पहिलेच झाली असेल. म्हणजे नुरा कुस्ती झाली असे पाकिस्तानचे पत्रकार सांगत आहेत आणि आपल्या देशावर विनोद करत आहेत. पाकिस्तानचे पत्रकार सांगतात भारत सरकारने भारतीय जनतेला सांगितले की, आम्ही असे करून, त्यांची वाट लावू पण तिकडे पाकिस्तानला सांगून टाकले. म्हणजे त्या आतंकवादी ठिकाणावरून माणसे हस्तांतरीत करण्यासाठी वेळ मिळाला. म्हणूनच भारत-पाकिस्तान युध्दाला नुरा कुस्ती म्हणत आहे.


पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेवून एक जुना ईतिहास सांगितला जो एस.जयशंकरच्या कामासोबत जोडला. मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधान असतांना पाकिस्तानमध्ये रॉ या संस्थेच्या सदस्यांनी अनेक वर्ष मेहनत करून पाकिस्तानचा परमाणु ठिकाणा शोधला. याची माहिती मुरारजी देसाई यांनी तत्कालीन पाकिस्तानचे प्रमुख जनरल झियाउलहक्क यांना दिली. त्यानंतर काही दिवसातच रॉ चे सर्व एजंट पाकिस्तानमधून गायब झाले ते आज सुध्दा त्यांचे काय झाले याची माहिती देशाकडे नाही. त्यानंतर मोरारजी देसाई यांना पाकिस्तान देशाने निशान ए पाकिस्तान हा सन्मान दिला. म्हणजे भारत देशात असेच सुरू आहे का? म्हणून देशासोबतची गद्दारी सहन केली जाणार नाही. अजहर मसुदला आयसी 814 हे विमान आणि त्यातील प्रवाशी सोडवतांना एकदा सोडले आणि आज हल्याच्यापुर्वी पाकिस्तानला हल्याची माहिती देवून त्याला पुन्हा एकदा सोडले असा आरोप पवन खेडा यांचा आहे. युध्दा फक्त सिमेवर होत नाही. राजधानीमध्ये सुध्दा त्याची तयारी होत असते. पवन खेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे सी.एम. असतांना त्यांनी सांगितले एक वाक्य बोलून प्रश्न विचारला. नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले वाक्य असे आहे की, समस्या सिमेवर नाही. तर दिल्लीत आहे आणि आजच्या परिस्थिती सुध्दा समस्या सिमेवर नाही तर ती दिल्ली आहे असा आरोप पवन खेडा यांनी केला. नरेंद्र मोदी यांचे बरेच गुप्त ऱ्हस्य अमेरिका आणि चिनकडे असतील ते असुद्या परंतू नरेंद्र मोदी, एस.जयशंकर आणि इतर बी.जे.पी नेते देशासोबत करत असलेली गद्दारी आहे असा आरोप पवन खेडा यांनी केला. भारताने अनेक शिष्टमंडळे विदेशात पाठविण्याची तयारी केली आहे. ज्यामध्ये कॉंगे्रसने पाठविलेल्याा नावांपैकी एकही नाव न घेता शशी थरुर यांना त्या शिष्टमंडळात घेतले आहे. शशी थरुरमध्ये भरपूर मोठी कुट निती आहे. याला नाकारता येणार नाही. पण कॉंगे्रसने पाठविलेल्या नावांऐवजी शशी थरुरचे नाव का आले याचा शोध घेतला असता मागील काही वर्षांमध्ये शशी थरुर यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामांची केलेली प्रशंसा त्यासाठी महत्वपुर्ण ठरलेली आहे. भारत देश इतर देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवत आहे. परंतू कोणी विचारले आणि कोण ऐकायला तयार आहे. याचे काही उत्तर सरकार देत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!