नांदेड- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. अरविंद सरोदे यांचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी भौतिकशास्त्र अभ्यास मंडळावर नामनिर्देश केले आहे.
डॉ. सरोदे हे मागील २१ वर्षापासून विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र संकुलात पदार्थविज्ञान विषयाचे अध्यापनाचे कार्य करीत असून संशोधन कार्यालयात सुद्धा सक्रिय आहेत. त्यांचे ५० पेक्षा अधिक शोधनिबंध हे उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत ०४ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केलेली असून सहा विद्यार्थी व काही परदेशी विद्यापीठातील विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कौशल्याधारित अभ्यासक्रमाचे पदवी व पदवीचा अभ्यासक्रमात समावेश करून उत्कृष्ट अभ्यासक्रमाची रचना व मांडणी करून ते विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करून विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आंतराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे, भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. अशोक कुंभारखाणे, जनसंपर्क अधिकारी डॉ.अ अशोक कदम, सहाय्यक कुलसचिव रामदार पेद्देवाड यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
