महावितरण कंपनीची वितरण प्रणालीचा ढिसाळ कारभार ; नागरिक त्रस्त

नांदेडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या भागात लाईट तासनतास बंद असणे व महावितरण कंपनी तर्फे योग्य प्रतिसाद न देणे हा नित्यक्रम बनलेला आहे. असे होण्याचे काय कारण आहे यावर जर दृष्टी टाकली तर पुढील कारणांमुळे हे सर्व घडत असल्याचे दिसून येते. जसे की नांदेड नगरपालिकेचा महानगरपालिकामध्ये  बद्दल झाला परंतु कदाचित महावितरण कंपनी जुन्या काळातच आपले अस्तित्व टिकवून ठेवलेले असावेत. कारण नांदेड मध्ये दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत असल्याने नवीन नवीन इमारतीचे, व्यावसायिक प्रतिष्ठानच्या संख्येने मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विद्युत खप ही वाढलेला आहे.परंतु त्या मानाने विद्युत वितरण प्रणाली मध्ये लोड च्या हीशेबाने ट्रान्सफॉर्मर, विद्दूत सब स्टेशन उभारण्यात आलेले नाही. या व्यतिरिक्त जुन्या सप्लाय लाईन द्वारेच सप्लाय दीला जातो. त्यातच भर म्हणजे योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती करण्यात हलगर्जीपणा जसे विद्युत सप्लाय च्या मेन तारा लोंबकळत असणे, त्यांना झाडांचा स्पर्श होने, त्याच्या खालील सेफ्टी गार्ड तारा गायब होणे, ट्रान्सफॉर्मर च्या खाली एका ही ठिकाणी योग्य प्रकारे किटकॅट नसणे, ट्रान्सफॉर्मर खालील बॉक्स ला झाकणं नसणे, वेळोवेळी योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती करण्यात टाळाटाळ करने, अनुभव नसलेल्या स्टाफ ची संख्या जास्त असणे उदाहरणार्थ ट्रान्सफॉर्मर चोही बाजुंनी खुले राहने जरूरीचे असते कारण त्याला सगळीकडून हवा मिळने जरूरीचे असते परंतु अनेक वेळा स्पार्क होऊन खाली चिंनगाऱ्या पडत असल्याने कोणीतरी अनुभव नसलेल्या इंजिनिअर ने सर्व ट्रान्सफॉर्मर डी पी च्या आजुबाजुला पत्र्याच्या झाकण लावण्याची प्रथा सुरू केली. वारंवार लाईट बंद होण्याच्या कारणा मध्ये विद्युत लाईन च्या जुन्याच केबल व ओव्हर हेड लाईन ची योग्य प्रकारे मेंटेनन्स नियमित सुरळीतपणे न होणे आणखी एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटते सध्या महावितरण कंपनी फक्त व फक्त जास्तीत जास्त पैसे वसुल कसे करता येईल व पैसे कसे वाचवता येईल हे उद्दिष्ट अंगिकार केल्याचे दिसून येते.या मुळे सर्व लाईन स्टाफ व इंजिनिअर पैसे वसूल करण्यात आपल्याला झोकुन देतात तसे पाहिले तर हे ही फार जरुरीचे आहे परंतु या मुळे रेगुलर देखभाल करण्यात नाकर्तेपणा दाखविणे तसेच पैसे वाचविण्याचा नादात महावितरण प्रत्येक प्रभागात असलेल्या सब इंजिनिअर ऑफिस आपल्या स्वतःच्या जागेत स्थलांतर करण्यात आल्याने ते त्या एरिया पासून दुर अंतरावर असल्याने वेळोवेळी योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती करण्यात कसुरवार ठरत आहे व ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जास्तीचा वेळ लागत आहे. तरी महावितरण कंपनी च्या सर्व अधिकाऱ्यांना व महाराष्ट्र सरकार ला नम्र विनंती नांदेड शहरातील वाढलेल्या विद्युत मागणी व मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वस्ती व व्यावसायिक संकुलासाठी लागणाऱ्या योग्य विद्युत पुरवठा करण्यासाठी जुन्या लहान पावर चे ट्रान्सफॉर्मर ची क्षमता वाढवून व सब स्टेशन ची संख्या वाढवून आणि जुन्या मुख्य विद्युत सप्लाय केबल व ओव्हर हेड वायरिंग योग्य प्रकारे दुरुस्ती करून फक्त वसुली च्या मागे नाही लागता ग्राहकांना योग्य प्रकारे विद्युत वितरण करून नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाची दखल घेत योग्य प्रकारे विद्युत सप्लाय दीला जावा ही नम्र विनंती कारण पावसाळा येऊन ठेपला आहे.

–राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू

अबचलनगर, सामाजिक कार्यकर्ता नांदेड 7700063999*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!