नांदेड(प्रतिनिधी)-भारत दुरसंचार निगम कार्यालयात होत असलेला भ्रष्टाचार त्यांच्याच कार्यालयाच्या कर्मचाऱ्याने उघडकीस आणल्यानंतर त्याची बातमी करून बीएसएनएल अधिकारी अमित गुरदासानी यांना भेटण्यासाठी गेलेल्या पत्रकार धनंजय सोळंकेवर जमावाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आहे. एमकेएन न्युजचे पत्रकार धनंजय प्रल्हादराव सोळंके यांनी बीएसएनएल कार्यालयात जालना येथील कर्मचारी विजय जाधव यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीवरुन त्या कार्यालयात सुरू असलेल्या विविध भ्रष्टाचाराबद्दल बातमी केली. या संदर्भाने विजय जाधव यांची मुलाखत घेतली. याची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी ते बीएसएनएल कार्यालय नांदेड येथे महाव्यवस्थापक अमित गुरुदासानी यांना फोन करून बाईट घेण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी बीएसएनएल कार्यालयात गेले. त्यांची भेट झाली नाही. फोनवर त्यांनी 8 ऑक्टोबर रोजी येण्यास सांगितले. तरी पण त्यांची भेट झाली नाही. पुन्हा त्यांनी 9 ऑक्टोबर रोजी येण्यास सांगितले. त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास महा व्यवस्थापक अमित गुरदासानी यांना भेटण्यासाठी धनंजय सोळंके गेले. त्या ठिकाणी गुरदासानी भेटले नाहीत. पण बाहेर 40 ते 50 अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार दिसून आले. त्यांनी मला सांगितले की, गुरदासानी तुम्हाला काही बोलणार नाहीत. जे काही बोलायचे ते आम्हाला बोला, तुम्ही आमची बातमी कशी केली असे बोलत हुज्जत घातली आणि धक्काबुक्की केली. यावेळी कॅमेऱ्यात रेकॉर्डींग सुरू असतांना कॅमेरा बंद कर नाही तर कॅमेरा फोडतो असे सांगत कॉलर पकडून बाहेर काढले आणि शिवीगाळ करत तुझे तंगडे तोडून गायब करू अशी धमकी दिली. या संदर्भाने धनंजय सोळंके यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्यासह नांदेडचे पोलीस अधिक्षक आणि वजिराबादचे पोलीस निरिक्षक यांच्याकडे 9 ऑक्टोबर रोजी तक्रारी अर्ज दिले आहेत. भोकर येथील काही पत्रकारांनी या घटनेचा निषेध केला असून तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. संबंधित व्हिडिओ… https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2025/10/VID-20251009-WA0035.mp4 Kanthak Suryatal Post Views: 1,142 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या भावांना सहआरोपी करण्याची मागणी “आर्टी” च्या वतीने उद्या नांदेडमध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन