काल दि. 1 मार्च रोजी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती ब्लादिमिर जेलन्सकी यांची भेट झाली. ब्लादिमिर जेलन्सकीला विदुषक म्हणणाऱ्या डोनॉल्ड ट्रम्पला त्यांनी हे दाखवून दिले की, देशप्रेम काय असते. पण डोनॉल्ड ट्रम्पला ब्लादिमिर जेलन्सकी सोबत डिल करायची होती. डोनॉल्ड ट्रम्प हे व्यापाऱ्यासारखे वागत होते परंतू जेलन्सकी यांनी ते किती उत्कृष्ट राजकारणी आहेत हे दाखवले. एक व्यक्ती म्हणून जेलन्सकी ट्रम्पवर भारीच पडले. खरे तर मोदींनी जेलन्सकी यांच्याकडून देशप्रेम आणि देशाचे हित काय असते याची शिकवण घ्यायला हवी.
व्हाईट हाऊसला जेलन्सकी आले तेंव्हा ट्रम्प स्वत: त्यांच्या गाडीपर्यंत आले होते. पण त्यांनी तेथूनच जेलन्सकीची बेअब्रु करण्यास सुरूवात केली. या भेटीसाठी पत्रकारांना मोठ्या स्वरुपात बोलावण्यात आले होते आणि त्यांची एकूण सर्व भेट लाईव्ह करण्यात आली होती. त्यात 49 मिनिटे चर्चा झाली. गाडीतून उतरताच पत्रकारांकडेक बोट दाखवून जेलन्सकीच्या कपड्याकडे बोट दाखवले. त्यावेळी जेलन्सकी काही बोलले नाहीत. त्यांना ट्रम्प आत घेवून गेले आणि चर्चा सुरू झाली. खरे तर दोन राष्ट्राध्यक्षांची चर्चा होती. ती बंद दाराआड होणे आवश्यक होते. ही बैठक पत्रकारंासाठी सुध्दा खुली होती. अमेरिकेसह जगाने ही बैठक लाईव्ह पाहिली. या बैठकीत शिष्टाचाराशिवाय अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हॅन्स यांना सुध्दा बसण्याची परवानगी होती.
चर्चा सुरू झाली तेंव्हा सुरूवातीला जेलन्सकीने ब्लादीमिर पुतीनचा उल्लेख करून तो खूनी आणि दहशतवादी आहे असा उल्लेख करून त्याने माझ्या देशातील अनेक लोकांची हत्या केली, अनेक लोक बेघर झाले, अनेक बालकांची हत्या केली हे सांगत असतांना अमेरिकेने दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी माझे राष्ट्रपती बराक ओबामा आणि जो बायडन यांची नावे घेतली. त्यानंतर त्याला उत्तर देतांना ट्रॅम्प यांनी अनेक बाबी सांगतांना तुम्ही त्रासात आहात. एकटे जगू शकणार नाही. मला युध्द नको आहे अशा शब्दांसह जेलन्सकीची उंची, त्याने परिधान केलेले कपडे या माध्यमाने सुध्दा त्यावर आक्षेप घेतला. अत्यंत नम्रपणे सर्वकाही ऐकून जेलन्सकीने उत्तर दिले आज माझ्या देशात युध्द सुरु आहे. माझ्या देशातील लोकांना खाण्याची सोय नाही आणि या परिस्थितीत मी सुट, बुट, टाय घालून जगात वावरू शकत नाही. एकदा युध्द संपल्यानंतर मी बहुदा सर्वोत्कृष्ट सुट,बुट, टाय परिधान करेल. ते बहुदा आपल्या सुट,बुटपेक्षा जास्त महागाचे पण असतील किंवा कमी किंमतीचे असतील. यावेळी उपराष्ट्रपती व्हॅन्स यांनी तुम्ही बराक ओबामा आणि जो बायडन यांचे नाव घेत आहात खरे तर तुम्ही डोनॉल्ड ट्रम्प यांना धन्यवाद द्यायला हवे. अशी असते का कुटनितीक भाषा. हे सर्व ऐकत असतांना जेलन्सकी आपले डोळे इकडे-तिकडे फिरवत होते. याचा अर्थ असा होतो की, एकतर ते ऐकू इच्छीत नव्हते किंवा त्यांना या बोलण्याने त्रास होत होता. पण नंतर त्यांनी पण हिम्मत दाखवली आणि सांगितले की, व्हॅन्सला गप्प बसायला सांगा कारण यांना युक्रेनच्या लोकांचा त्रास माहित नाही. सन 2014 पासून पुतीन आमच्या जमीनीवर ताबा घेत आहे. आम्हाला त्रास देत आहे. युध्द तर 2022 पासून सुरू झाले आहे. तेंव्हा ट्रम्प तिनदा म्हणाले तुम्ही जगाला तिसऱ्या महायुध्दाकडे नेत आहात. तेंव्हा जेलन्सकी म्हणाले मी आपल्याला अगोदरच सांगितले होते की, अगोदर मला भेट द्या आणि नंतर पुतीनशी बोला. माझ्यापेक्षा माझ्या देशाचे हित मला सर्वोपरी आहे. त्यावेळेस पत्रकारांनी दोन्ही राष्ट्रपतींना प्रश्न विचारले त्यात एका भारतीय पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उदासिनता दाखवत मला काहीच कळले नाही असे म्हणून ट्रम्प गप्प बसले. एका अमेरिकन पत्रकाराने विचारले की, तुम्ही मध्यस्थी केल्यानंतर पुतीनने ऐकले नाही तर तेंव्हा ट्रम्पने उत्तर दिले आता तुझ्या डोक्यात बॉम्ब फुटेल तर.
हा सर्व घटनाक्रम पाहिली असतांना जेलन्सकीच्या येण्या अगोदर त्याची डिल जाहीर कशी झाली. पुतीनबद्दल बोलतांना अत्यंत सावधान पणे ट्रम्प बोलत होते. परंतू जेलन्सकीला धमक्या देत होते. पण अत्यंत बाणेदारपणे जेलन्सकीने ट्रम्पला उत्तरे दिली. कारण त्यांचा देश युक्रेन तीन वर्षापासून युध्दाच्या आगीत शेकला जात आहे. अनेक देशांनी आमच्या देशात आश्रय घ्या म्हटल्यानंतर सुध्दा जेलन्सकीने त्यांचे ऐकले नाही. ते आपल्या देशातच राहतात आणि आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देतात. असाच बाणेदारपणा भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमेरिकेत जॉन एफ केनडी यांना दाखवला होता. त्यांच्याच देशात इंदिरा गांधीला भेटण्यासाठी त्यांना 45 मिनिटे लागली होती. सर्वात मोठा बाणेदारपणा ब्लादिमिर जेलन्सकीने अमेरिकेच्या रात्रीच्या भोजला (डिनर पार्टी) न जावून दाखवला. काय गेम आहे हा ट्रम्प आणि जेलन्सकीचा याचा शोध घेवू तेंव्हा युक्रेनमध्ये खनीज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेेने आजपर्यंत 350 बिलियन डॉलर युके्रन युध्दा ओतलेले आहेत. त्याचा मोबदला त्यांना घ्यायचा आहे. त्यांच्या सर्व खानी आणि पर्वते त्यांना ताब्यात हवीत. त्यासाठीच ट्रम्प ही सर्व खेळी करत आहेत. एखाद्या मध्यस्थाचे काम करत असतांना खालच्या स्तरावर बोलण्याचा अधिकार असतो काय? आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती जो बायडन यांना मुर्ख राष्ट्रपती म्हणून उल्लेख करण्याचा अधिकार गादीवर बसलेल्या राष्ट्रपतीला असतो काय? असे अनेक प्रश्न या बैठकीतून समोर आले. युध्द थांबवायचे आहे असे सांगून तुम्ही जोरात बोलल्याने ते खरे ठरत नाही असे सुध्दा जेलन्सकीने सांगितले. मला 100 प्रश्न विचारा पण 2022 पुर्वीपर्यंत कोणी पुतीनला प्रश्न विचारले होते काय? हीच कुट निती असते काय असा सवाल जेलन्सकीने उपस्थित केला.
मला सुध्दा युध्द नको आहे पण माझ्या देशाचा सन्मान महत्वपुर्ण आहे. का पुतीनला युक्रेन त्यांच्या देशात हवा. का आम्ही त्यांची बांडगुळे व्हावेत याचे उत्तर जगातील कोणतेच व्यक्ती पुतीनला विचारत नाहीत आणि युध्दाबद्दल मध्यस्थी करण्याची भुमिका दाखवणाऱ्या ट्रम्पला जेलन्सकीचा अपमान करता येणार नाही. कारण ते सुध्दा एक राष्ट्राध्यक्ष आहेत. या सर्व चर्चा 49 मिनिटे चालल्या आणि ही बैठक जगासाठी लाईव्ह होती. अमेरिका या भेटून आपल्यासाठी राजकीय फायदा शोधत आहे. अमेरिका जगाला दाखवू इच्छीतो की, जगात आम्हीच सुपरमॅन आहोत. पण आजच्या परिस्थितीत अमेरिकेतील नागरीक जगाला आवाहन करीत आहेत की, अमेरिकेतल्या वस्तु खरेदी करू नका यावरून अमेरिकेच्या जनतेला दोन महिन्यातच ट्रम्पला निवडुण दिल्याचे दु:ख झालेचे दिसते. काल झालेल्या बैठकीनंतर युरोपीय देश जेलन्सकीला पाठींबा देत आहेत. झालेल्या बैठकीनंतर असा एक विचार मांडता येईल. जागतिक नेता व्हायचे असेल तर शिव्या देता आल्या पाहिजेत, जाहीर अपमान करता आला पाहिजे असेच आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. ते सुध्दा आपल्या सर्वच माजी पंतप्रधानांबद्दल वाईट बोलतात. असो जगात होणारा हा नवीन बदल जगासह भारताला सुध्दा मोठा धक्का देणार आहे.