मुदखेड (प्रतिनिधी) – भारतातील अमानवी रुढी परंपरा व विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करुन गुरु रविदासांनी चौदाव्या शतकात सामाजिक समतेचा क्रांतीकारी विचार मांडला असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
गुरु रविदास चौक, मुदखेड जि. नांदेड येथे आयोजित गुरु रविदासांच्या ६२७ व्या जयंती महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व प्रखर वक्ते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते प्रवीणदादा गायकवाड हे होते.
आपल्या प्रभावी भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ व्या शतकात जी सामाजिक क्रांती केली तशी सामाजिक क्रांती गुरु रविदासांनी चौदाव्या शतकात केली, त्यामुळेच आपले जीवनमान बदलू शकले. या देशात जनावरांना किंमत होती पण माणूस उपेक्षित होता. महामानवांमुळेच आमचे जीवनमान बदलले आहे. त्यामुळेच आज आम्ही मानसन्मानाचे जीवन जगत आहोत, याची जाण ठेवा व आपल्या लेकरांना भरपूर शिक्षण घेऊ द्या असे उपस्थितांना प्रभावित करणारे अभ्यासपूर्ण विचार यावेळी त्यांनी बोलतांना मांडले.
यावेळी चर्मकार महासंघाचे प्रांताध्यक्ष माधव गायकवाड, माधव पाटील कदम, पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, पोलीस उपनिरीक्षक बी. आर. कांबळे, शिवाजी शिंदे, बालाजी पाटील खटिंग, प्रतापराव देशमुख बारडकर, पिंटू पाटील वासरीकर, देविदासराव गायकवाड, लक्ष्मणराव दवंदे, उमाकांतराव घोंगडे, नागोराव पाटील पचलिंग, संजय उर्फ पप्पू सोनटक्के, प्रकाश पाटील सूर्यवंशी, शिवा तरोडकर, संजय चव्हाण, रावसाहेब चौदंते, साहेबराव राहेरकर, अबू शेठ गुडमलवार, अविनाश झमकडे, सचिन माने पाटील, सचिन चंद्रे, सुरेश शेटे, मुजीब पठाण, गिरीश कोत्तावार, कुणाल चौदंते, गंगाधर कुंचटवाड, मनोज कमटे, बालाजी गऊळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुरु रविदास यांची रांगोळीच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रतिमा रेखाटणाऱ्या विद्यार्थिनी कु. वैजश्री सोनटक्के, कु. सोज्वल सोनटक्के, कु. अंजली सोनटक्के या तीन विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय सोनटक्के, धारबा सोनटक्के, गजानन सोनटक्के, दत्ता सोनटक्के, शिवराम सोनटक्के, नागोराव नारायणकर, तानाजी सोनटक्के, भगवान दुधंबे, दत्ता सोनटक्के, बालाजी सोनटक्के, पप्पू जोगदंड, बालाजी देशमाने, प्रदीप अन्नपूर्णे, सुभाष दुधंबे यांच्यासह शहर व तालुक्यातील सर्व चर्मकार समाज बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन पत्रकार संजय कोलते यांनी केले तर आभार दत्ता सोनटक्के यांनी मानले.