नांदेड,(प्रतिनिधी)-आज सकाळी 7 वाजता शहरातील वाय पॉईंट जवळच्या रस्त्यावर एका 30 ते 35 वर्षीय युवकाचा निघृन खून करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. पोलीस प्रशासन त्यासाठी परिश्रम घेत आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास अमोल भुजबळे उर्फ एमजे हा युवक आपली दुचाकी क्रमांक एम एस 26 बी आर 1383 वर बसून जात असताना शहरातील वाय पॉईंट जवळ त्याच्यावर हल्लेखोरांनी हत्यारांनी हल्ला केला. दिसत्या परिस्थितीनुसार त्याच्या गळ्यावर आणि पोटातील किडन्या असतात त्या ठिकाणी गंभीर वार करण्यात आले आहेत. युवक अमोल भुजबळे रस्त्यावरच पडला आणि तेथेच मरण पावला आहे. अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उप अधीक्षक सुशील कुमार नायक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलिस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. वृत्त लीहीपर्यंत मारेकरी कोण आहे याची माहिती मिळाली नाही. अमोल भुजबळे हा निर्मल हॉस्पिटल येथील डॉक्टर कडे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता असे सांगण्यात आले. अमोल भुजबळे ला एमजे या टोपण नावाने ओळखले जात होते. तो खोब्रागडे नगर क्रमांक 2 येथे राहत होता.
2 thoughts on “एमजेचा निघृन खून”