नांदेड(प्रतिनिधी)-सकाळी 7 वाजता शहरातील वाय पॉईंटजवळ दोन हल्लेखोरांनी एका युवकाचा खून केला होता. नांदेड जिल्हा पोलीसांनी भरपूर मेहनत घेवून लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोकी याा गावच्या दोन भावांना ताब्यात घेतले आहे.
आज सकाळी 7 वाजेच्यासुमारास गणेशनगरमधून आपल्या घरासाठी दुध खरेदी करण्यासाठी आलेल्या युवक अमोल भुजबळे उर्फ एम.जे.हा दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बीआर.1383 वर बसलेला होता आणि तो दुध खरेदी करत होता. त्याच्या पाठीमागे एक चार चाकी वाहन उभे होते. त्या चार चाकी वाहनाच्या पाठीमागे दोन युवक दिसत होते. त्यातील एकाने हेलमेट परिधान केले होते आणि एकाने तोंडाला रुमाल बांधलेला होता. अमोल भुजबळेचे लक्ष नाही याची संधी साधून ते दोघे पळत आले आणि त्यातील एकाने उजव्या हातात असलेल्या चाकूने अमोल भुजबळेच्या मानेवर उजव्या भागात हल्ला केला. तो चाकू अमोल भुजबळेच्या मानेत घुसून बाहेर निघाला. दुसऱ्या युवकाच्या हातात पण हत्यार होते. तो सुध्दा हल्ला करू लागला. अमोल भुजबळेने दोंघांचा बराच विरोध केला. पण जखम झाल्यामुळे त्याही अवस्थेत तो पळाला. हे भांडण गणेशनगरमधील महात्मा फुले शाळेसमोर सुमोरील एका दुकानासमोर सुरू होते. जखमी अमोल भुजबळे पळला. हल्लेखोर त्याच्या मागे धावले आणि हल्लेखोरंानी वाय पॉईंटजवळच्या रस्त्यावर पुन्हा एकदा अमोल भुजबळेवर हल्ला केला. झालेल्या जखमा गंभीर होत्या. अमोल भुजबळे जागीच मरण पावला.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गोपाळ वाकोडे आणि निखील वाकोडे दोेघे रा.ढोकी ता.जि.नांदेड यांना ताब्यात घेतले आहे. काही जण सांगतात हे आपसातील जुन्या वादामुळे हा प्रकार घडला आहे. अमोल भुजबळेला ढोकी गावात सरपंच व्हायचे होते. या अगोदर सुध्दा भांडणे झाली आहेत. तो राग मनात असल्यामुळे हा खून प्रकार घडला आहे असे ढोकी गावचे लोक सांगतात.
संबंधीत बातमी..

One thought on “सकाळी झालेल्या खून प्रकरणातील मारेकरी 12 तासात पोलीसांच्या ताब्यात”