नांदेड(प्रतिनिधी)-पदोन्नती प्राप्त झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात नियुक्ती मिळालेल्या 17 पोलीस उपनिरिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील 18 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदाची पदोन्नती मिळाली होती. त्यांना पोलीस उपमहानिरिक्षकांनी जिल्हा वाटप केले त्यात एक पोलीस उपनिरिक्षक हिंगोली जिल्ह्यात गेले आणि इतर 17 जणांना नांदेड जिल्ह्यात नियुक्ती मिळाली. नियुक्ती मिळाल्यानंतर त्यांना पुढीलप्रमाणे नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. गजेंद्र गोविंदराव मांजरमकर-कुंडलवाडी, चंद्रकांत गंगाधरराव पांचाळ-लोहा, विठ्ठल काशिनाथराव दावलबाजे-नायगाव, संजय नन्हु मुंडे-माळाकोळी, प्रल्हाद संभाजी हैबतकर-विशेष शाखा, शेषराव विठ्ठलराव येनगंटे-इतवारा, अशोक किशनराव बनसोडे-कंधार, अजय कुलभूषण साखळे-शहर वाहतुक विभाग, सोमनाथ गंगाधरअप्पा स्वामी-बिलोली, उत्तम किशनराव गुट्टे-हिमायतनगर, संभाजी विठ्ठलराव हनवते-पोलीस उपअधिक्षक कार्यालय भोकर येथे वाचक, बसवंत बागन्ना मुत्तेपोड-धर्माबाद, गंगाधर लालु गायकवाड-जिल्हा नियंत्रण कक्ष, दत्ता तुकाराम वाणी-माहुर, सय्यद अहेमदसाब मोईयोद्दीन-कंधार, कृष्णा जगदीश सुर्यवंशी-नियंत्रण कक्ष नांदेड, परमेश्र्वर भाऊराव सुर्यवंशी-सिंदखेड.
पदोन्नती प्राप्त पोलीस उपनिरिक्षकांना नियुक्त्या
