इस्रायलने जाहीरपणे दावा केला आहे की इराणचे वरिष्ठ नेते अली लारी जानी यांची त्यांनी हत्या केली आहे. मात्र, या गंभीर दाव्यावर इराणकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. उलट, त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून फक्त एक हस्तलिखित संवेदना पत्र प्रसारित करण्यात आले आहे आणि तेही पूर्णपणे वेगळ्याच घटनेशी संबंधित आहे.म्हणजे अली लारी जानी जिवंत आहेत असेच म्हणावे लागेल. हे संवेदना पत्र त्या घटनेबद्दल आहे ज्यामध्ये अमेरिकेने भारताकडे परतणाऱ्या नौसेनेच्या जहाजावर हल्ला करून शंभराहून अधिक सैनिकांचा बळी घेतला होता. हे पत्र स्वतः अली लालीजानी यांनी लिहिले असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच, त्यांच्या मृत्यूच्या बातम्या येण्याआधीच त्यांचे लिखाण सार्वजनिक झाले होते यामुळे संपूर्ण प्रकरण अधिक संशयास्पद बनते. याच दरम्यान, काही तासांपूर्वी त्यांनी एक भडक वक्तव्य करत सर्व मुस्लिम देशांना थेट प्रश्न विचारला होता तुम्ही नेमके कोणाच्या बाजूने उभे आहात? तुमच्या धर्माने दिलेली शिकवण विसरलात का? गेल्या १८ दिवसांपासून ते अमेरिका आणि इस्रायलसाठी उघड आव्हान ठरत होते. त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्टही व्हायरल झाली होती, ज्यात इराणच्या उच्च नेत्यांना लक्ष्य करण्याचे उघड आवाहन दिसत होते. दरम्यान, इराणचे कथित नवे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनाई यांच्याबाबतही गोंधळ कायम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की ते जखमी झाले होते आणि त्यानंतर ते सार्वजनिकपणे दिसलेले नाहीत. ते जिवंत आहेत की मृत, याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. त्यामुळे ही सर्व माहिती केवळ अफवा पसरवण्याचा भाग असल्याचे तज्ञांचे मत आहे. २८ फेब्रुवारी रोजी, ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर बागेत फिरत असताना हल्ला झाल्याचे सांगितले जाते. काहीजण तर त्यांचा मृत्यू झाल्याचाही दावा करत आहेत, तर काही अहवालांनुसार त्यांच्यावर सध्या मॉस्कोमध्ये उपचार सुरू आहेत पण याची कुठलीही अधिकृत पुष्टी नाही. याच पार्श्वभूमीवर, ६ मार्चनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूही सार्वजनिकरित्या दिसले नाहीत, त्यामुळे त्यांच्या बाबतीतही अशाच अफवा पसरल्या. त्यामुळे सध्या फिरत असलेल्या नव्या बातम्या या केवळ अफवांचा भाग असू शकतात, अशी चर्चा जोरात आहे. १७ मार्चच्या मध्यरात्रीनंतर इस्रायलने अली लारी जानी यांना लक्ष्य करून हल्ला केल्याचा दावा केला आहे. इस्रायली संरक्षण दलानेही एका कमांडरची हत्या केली असे म्हटले आहे. मात्र, अली लारी जानी यांच्याशी संबंधित कोणतीही संस्था किंवा इराणमधील कोणत्याही अधिकृत व्यक्तीने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही. विशेष म्हणजे, आयआरजीसी (IRGC) च्या पद्धतीनुसार, अशा प्रकारची घटना घडली तर ती लपवली जात नाही. उलट, ते स्वतः पुढे येऊन स्पष्टपणे जाहीर करतात की अमुक व्यक्ती शहीद झाली आहे. त्यामुळे सध्याची शांतता आणि विरोधाभासी माहिती पाहता, इस्रायलचा दावा कितपत खरा आहे, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Kanthak Suryatal Post Views: 714 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्हा परिषदेच्या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजूरी; सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास नांदेडमध्ये महापुरुषांच्या प्रतिमेच्या अवमानाबाबत नगरसेवक सत्यपाल सावंत यांची तक्रार; तात्काळ कारवाईची मागणी