नांदेड(प्रतिनिधी)-गुरुद्वारा गेट नंबर 6 समोर गोळीबार करून एकाचा जीव गेला आणि दुसरा जखमी आजही उपचार घेत आहे. या प्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या दोन जणांना मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी दि.20 फेबु्रवारीपर्यंत अर्थात सहा दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.10 फेबु्रवारी रोजी गुरुद्वारा परिसरातील गेट क्रमांक 6 समोर एका हल्लेखोराने आपल्या पिस्तुलातून दोन दुचाकी स्वारांवर हल्ला केला. त्यात रविंद्रसिंघ राठोड आणि गुरमितसिंघ सेवादार हा गोळ्या लागलेल्या अवस्थेत उपचार घेत आहे.
नांदेड पोलीसांनी टीमवर्क करत तिसऱ्याच दिवशी दोन जणांना अटक केली त्यांची नावे मनप्रितसिंघ उर्फ मन्नू गुरबक्षसिंघ ढिल्लो (31) आणि हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी बाबूसिंघ कारपेंटर (25) या दोघांना काल दि.13 फेबु्रवारी रोजी अटक केली. आज वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोघांना न्यायालयासमक्ष हजर करून पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. या प्रकरणातील तथंश शोधण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे पोलीसांनी न्यायालयासमक्ष सादर केले. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी आणि मनप्रितसिंघ उर्फ मन्नूला सहा दिवस अर्थात 20 फेबु्रवारी 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी..