नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारी रोजी गुरुद्वारा गेट क्रमांक 6 जवळ झालेल्या गोळीबार प्रकरणात अत्यंत मोठे यश संपादन करून नांदेड पोलीसांनी पोलीस हा फक्त एकटा नसतो तर ते कुटूंब असत हे सिध्द करून दाखवल. पोलीसांनी केलेल्या मेहनतीत टिम वर्क यशाला आल आणि गोळीबार करणाऱ्याला मदत करणाऱ्यांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.
दि.10 फेबु्रवारी रोजी एका हल्लेखोराने दुचाकी क्रमांक एम.एच.15 ए.के.5682 वर बसलेल्या दोन युवकांवर गोळीबार केला. त्यात रविंद्रसिंघ राठोड हा दुचाकी चालवत होता आणि त्याच्या पाठीमागे गुरमितसिंघ सेवादार स्वार होता. वैद्यकीय सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 8 ते 10 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यातील बहुतांश गोळ्या गुरमितसिंघ सेवादारच्या शरिरातून आरपार झाल्या आणि त्यातील काही गोळ्या रविंद्रसिंघ राठोडला लागल्या. हल्लेखोराचा मुळ टार्गेट गुरमितसिंघ सेवादारच होता. हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात एका भाविकाची चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.49 ए.एस.9685 या गाडीत उजव्या बाजूच्या मागच्या खिडकीवर झालेल्या गाळीबाराची गोळी त्या वाहनाच्या डावीकडील दरवाज्याबाहेर निघाली. जेथे हा घटनाक्रम घडला. त्या ठिकाणी तीन रिकाम्या पुंगळ्या सुध्दा सापडल्या होत्या. या प्रकरणी उपचार सुरू असतांना रविंद्रसिंघ दयासिंघ राठोडचा मृत्यू झाला आणि गुरमितसिंघ सेवादार आजही दवाखान्यात उपचार घेत आहे. गुरमितसिंघ सेवादार हा बबर खालसाच अतिरेकी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधूचा भाऊ सत्येंद्रसिंघ उर्फ सत्याचा खून केल्याच्या आरोपात तुरूंगात जन्मठेपीच शिक्षा भोगणारा कैदी आहे. तो संचित रजेवर(पॅरोल) मागच्या 12 दिवसापुर्वी नांदेडला आला होता. त्याच्या संचिते रजेचे आणखी 18 दिवस शिल्लक होते. संचित रजा विहित कालावधीनंतर तुरूंगातील नियमावलीप्रमाणे 30 दिवसांसाठी भेटत असते. आपल्या भावाला मारले म्हणूनच रिंदानेच हा हल्ला घडविला आहे याच दृष्टीकोणातून या घटनेचा तपास सुरू होता. हल्लेखोराने हल्ला केल्यावर दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.के.1564 बसून पळून गेला होता. हल्लेखोराचे चित्र पाहिले असता तो नांदेड जिल्ह्याचा रहिवासी असेल असे दिसत नाही. अर्थात कोणाच्या तरी मदतीनेच त्याने 10 फेबु्रवारीचा हल्ला घडविला असेल अशा पध्दतीने पोलीस तपास करत होते. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, खंडेराय धरणे, संतोष तांबे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार या हल्याचा छडा लावण्यासाठी परिश्रम घेत होते. अखेर त्या सर्वांच्या एकत्रीत परिश्रमाला यश आले आणि त्यांनी मनप्रितसिंघ उर्फ मन्नु गुरूबक्षसिंघ ढिल्लो (31) रा.शहिदपुरा नांदेड आणि हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी बाबूसिंघ कारपेंटर (25) रा.शहिदपुरा नंादेड या दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून एक बिना नंबरची दुचाकी गाडी आणि एक काळ्या रंगाची, काचांना काळी फिल्म लावलेली चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 सी.डी.1699 अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार काळ्या फिल्मच्या चार चाकी गाडीत बसून हल्लेखोराने गुरमितसिंघजी रेखी केली आणि त्यानंतर 10 फेबु्रवारी रोजी त्यावर हल्ला केला. त्यात रविंद्र राठोडचा मृत्यू झाला आणि गुरमितसिंघ जखमी झाला. हल्लेखोर हा नांदेड जिल्ह्याचा दिसत नाही ही बाब नांदेड जिल्ह्यात राहणारा सर्वसाधारण व्यक्ती सुध्दा समजू शकतो. कारण आपल्या भागात राहणाऱ्या माणसांचे चेहरे ओळखू येतात. या घटनेवर रिंदाचे नाव जोेडले असल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा करणाऱ्या एनआयएच्या विभागाने सुध्दा हालचाली सुरू केल्या आहेत. काही जण सांगतात हल्लेखोर कोण आहे. हे एनआयएला माहित आहे. कारण त्यांच्याकडे नांदेड पोलीसांनी हल्लेखोराचे चित्र पाठविले आहे. नांदेडमध्ये झालेला हा गोळीबार आणि त्याची उकल अत्यंत छोट्याशा कालखंडात अर्थात 13 फेबु्रवारी रोजी करुन नांदेड पोलीसांनी केलेली कामगिरी प्रशंसनिय आहे.
संबंधीत बातमी…
10 फेब्रुवारीच्या गोळीबाराची उकल नांदेड पोलीसांनी केली ; दोन अटकेत
