नांदेड (प्रतिनिधी)-भोकरच्या सहायक पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनात हिमायतनगर पोलिसांनी चोरटी वाळे घेवून जाणारा एक ट्रॅक्टर पकडला आहे आणि दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
हिमायतनगरचे पोलीस उपनिरीक्षक शंकर गोबराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर दोन वाजेच्या सुमारास पैनगंगा नदी पात्र हिमायतनगर येथे ते गस्त घालत असताना त्यांना ट्रॅक्टर क्र.एमएच-२९-ए.क्यु-२८७६ सापडला. त्यामध्ये चोरटी वाळू भरलेली होती. पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक शंकर जाधव यांनी हि कारवाई केली. पोलिसांनी पाच लाखाचा ट्रॅक्टर आणि पाच हजार रुपयांची वाळू असा पाच हजार रुपयांचा मुद्देमाल या प्रकरणी जप्त केला आहे. हिमायतनगर पोलिसांनी गजानन श्रीराम माने (३७) रा.रिठाबोरी ता.उमरखेड जि.यवतमाळ आणि नारायण कोंडीबा माने (६२) रा.रिठाबोरी ता.उमरखेड जि.यवतमाळ यांच्याविरुध्द गुन्हा क्र.२७/२०२५ दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार पाटील करीत आहेत.
हिमायतनगर पोलिसांनी चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला
