हिमायतनगर पोलीसांनी अवैध मद्य पकडले ; पाच जणांना अटक दोन फरार

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलीसांनी 22 जानेवारी रोजी त्यांच्या हद्दीतील 3 ठिकाणी पाच जणांना पकडून त्यांच्याकडून एकूण 15 हजार 840 रुपयांचे अवैध मद्य, 12 हजार 150 रुपये रोख रक्कम, दोन तलवारी आणि एक खंजीर जप्त केला आहे. त्यात दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
भोकरच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनात हिमायतनगरचे पोलीस निरिक्षक अमोल भगत, पोलीस अंमलदार जंकट, मकसुद, कदम, मुलमुले, सोनपाखरे, हनवते, गुंडेवार, तेलंग, पिंगलवाड, साखरे, जाधव, आऊलवार यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून शेख जिलानी शेख बाबा (50), वसंत अमरसिंग राठोड(46), रोहित वसंत राठोड (21), अक्षय लक्ष्मण राठोड (23), तानाजी सदाशिव सोळंकी(41) या पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून अवैद्य मद्य, रोख रक्कम, दोन तलवारी आणि एक खंजीर असा 36 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या छापा प्रकरणातील राजू जयस्वाल आणि गजानन जाधव हे दोन आरोपी पळून गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!