नांदेड येथे राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन

 

नांदेड- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड व महाराष्ट्र बुध्दीबळ असोसिएशन, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने 20 ते 24 जानेवारी, 2025 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे संपन्न होत असून या स्पर्धेचे उदघाटन आज दि. 21 जानेवारी,2025 रोजी दु. 2.00 वा. संपन्न झाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्रीमती अलंकृता ल. कश्यप-बगाटे, जिल्हा कोषागार अधिकारी, जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी,निखील (निरीक्षक, एस.जी.एफ.आय.),दिनकर हंबर्डे, सचिव नांदेड जिल्हा बुद्धिबळ संघटना, प्रवीण ठाकरे (पंच प्रमुख) आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या प्रसंगी प्रस्ताविकात जयकुमार टेंभरे यांनी म्हणले की, या राष्ट्रीय स्पर्धेकरीता भारतातील विविध 31 राज्यातून खेळाडू मुले-मुली, क्रीडा मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक उपस्थीत झाले असून त्याची निवास व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृह,नांदेड व जत्थेदार गुरुद्वारा लंगर साहब, नांदेड येथे करण्यात आली आहे. तसेच ही स्पर्धा एकूण 06 फे-यामध्ये होणार असल्याचे सांगीतले.

 

अध्यक्षीय भाषनात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बुध्दीबळ हा खेळ बौध्दीक विकास घडवुन आणतो व आपल्या पुर्वजापासुन म्हणजेच राजे-महाराजेयांचेकडून खेळत आलेला खेळ आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी भविष्यात निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ खेळून आपल्या देशाचे नांव लौकीक करतील अशी आशा बाळगून उपस्थित सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच या राष्ट्रीय स्पर्धेकरीता आमदार आनंद तिडके यांनी उपस्थित राहून सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेकरीता पंच म्हणुन अमरीश जोशी (छत्रपती संभाजीनगर), शार्दुल तापसे (सातारा), भुपेंद्र पटेल (अहमदाबाद, गुजरात), पल्लवी कदम (अंबेजोगाई, बीड) सुचिता हंबर्डे (नांदेड), गगनदिपसिंघ रंधावा (नांदेड), शिषीर इंदुरकर (नागपूर), नथ्‍थु सोमवंशी (जळगांव), चैतन्य गोरवे (परभणी) सिध्दार्थ हटकर (नांदेड),प्रशांत सुर्यवंशी (नांदेड), श्रीमती ऋतुजा कुलकर्णी (नांदेड) आदी काम करीत आहेत.

स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.इम्तियाज खान यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.राहुल श्रीरामवार यांनी केले

सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी जयकुमर टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, निळकंठ श्रावण (क्रीडा मार्गदर्शक, हिंगोली), राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी) विपुल दापके (क्रीडा अधिकारी), वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण,आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, वैभव दोमकोंडवार, ज्ञानेश्वर सोनसळे, सुशिल कुरुडे, कपील सोनकांबळे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व बुध्दिबळ असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदिनी सहकार्य करीत आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!