नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे निलंबित; पोलीस उपमहानिरिक्षकांचा आदेश; रोडेंची न्यायाधीकरणाकडे धाव

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांना निलंबन करण्याचे आदेश पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जारी केले आाहेत, आणि आजच हे आदेश न पटल्यामुळे विश्र्वदिप रोडे महाराष्ट्र न्यायाधीकरण प्राधिकरणात गेले आहेत.

दि.6 जानेवारी 2025 रोजी एका पित्याने आपली मुलगी पळून गेली आहे आणि तिचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरिक्षक रोडे पैसे मागत असल्याची तक्रार 6जानेवारी रोजी लिहिली ती पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयात दि.13 जानेवारी 2025 रोजी आवक झाली. त्यावर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी प्रष्ठांकन केले आहे. पीएसआय रोडे यांना निलंबित करण्यात येत आहे. त्यांची प्राथमिक चौकशी पोलीस उपअधिक्षक इतवारा यांना देण्यात आली आहे, आणि त्याखाली त्यांनी स्वाक्षरी केली आहे आणि स्वाक्षरीच्या खाली दि.10 जानेवारी 2025 असे लिहिले आहे.

या प्रकरणात एका व्यक्तीची मुलगी जी 28 वर्षाची आहे. ती लग्न झाल्यानंतर आपल्या प्रियकरासोबत पंचवटी नाशिक येथून 5 जानेवारी 2025 रोजी पळून गेली. त्याबाबत पंचवटी नाशिक पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल आहे. तरी पण त्या लोकांनी नांदेड येथे येेवून तक्रार दिली. कारण ते नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहणारे आहेत. या सर्व प्रकरणात पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांची भेट घेतल्यानंतर पळून गेलेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी विश्र्वदिप रोडे यांनी केली. तेंव्हा एकाने 50 हजार, एकाने 30 हजार असे एकूण 80 हजार रुपये पोलीस उपनिरिक्षक रोडे यांच्यासोबत असणाऱ्या पोलीस शिपायाला दिले. पैसे घेवून सुध्दा आमची तक्रार नोंदवून घेतली नाही. तरी त्यांच्यावर योग्य कायदेशीर कार्यवाही व्हावी असा तो अर्ज आहे.

6 जानेवारी 2025 रोजी लिहिलेला अर्ज पोलीस उपमहानिक्षिक कार्यालयात 13 जानेवारी 2025 रोजी आला असा शिक्का त्या अर्जावर लिहिलेला आहे. पण त्यावर पोलीस उपमहानिरिक्षकांनी केलेले प्रष्ठांकन तीन दिवसांपुर्वीचे अर्थात 10 जानेवारी 2025 चे आहेत आणि याच अर्जावर पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उप महानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जारी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!