भारताच्या 140 कोटी लोकांना विदुशकांचा गट लोकशाहीचे धडे देत आहे

कालपर्यंत दैविक असलेले भारताचे पंतप्रधान आता अचानकच मनुष्य झाले आहेत. ही मुलाखत त्यांनी एका अरबपती पत्रकाराला दिली आहे. त्या मुलाखतीच्या दोन मिनिटाचा ट्रेलर त्या अरबपती पत्रकाराने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. यानंतर मात्र मोदींची हुजूरेगिरी करणाऱ्या वृत्तवाहिन्यांचे संपादक, अँकर, अँकरीका यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. आता यांच्याबद्दल असे म्हणावे लागेल की, भांड हे अखेर भांडच असतात. त्यांनी फक्त कोलांट उड्या माराच्या आणि त्या सुध्दा आपल्या मालकाच्या मर्जीवर.
आर्टीकल-19 चे नवीनकुमार यांनी तयार केलेल्या एका व्हिडीओ प्रमाणे नरेंद्र मोदी यांचा अरबपती पत्रकार निखील कामत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पर्दाफाश करणारा आहे. मी अवतार आहे, नॉनबॉयोलॉजिकल आहे असे म्हणणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मी सर्वसामान्य माणुस आहे, माझ्याकडूनही चुका होतात असे म्हणत आहेत. आजपर्यंत मोदी नॉनबॉयोलॉजिकल आहेत, ते दैविशक्ती आहेत, ते कधी आराम करत नाहीत, कधी थकत नाहीत अशा बढाया मारणाऱ्या, त्यांची पायधरणी करणाऱ्या पत्रकारांची वाट लागली आहे. या मुलाखतीच्या अनुशंगाने असे म्हणावे लागेल की, भांड हे भांडच असतात. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता तुम्ही आपली शक्ती मागे घेवून बसा मला गरज पडेल तेंव्हा तुम्हाला बोलवले जाईल असाच होतो. या नवीन मुलाखतीतून असाही संदेश दिसतो की, तुम्ही कितीही चांगले संपादक असलात, कितीही चांगले अँकर असलात तरी मला फक्त अरब पती पत्रकारच आवडतो. पत्रकारीता करण्यासाठी तुमची काही गरज नाही असे नरेंद्र मोदींनी दाखवले आहे.
कोण आहे निखिल कामत. सन 2010 मध्ये निखिल आणि त्यांचे बंधू नितीन कामत यांनी झिरोधा नावाची कंपनी स्थापन केली. याशिवायही त्यांच्या बऱ्याच कंपन्या आहेत. आणि सन 2024 मध्ये फोबने जाहीर केलेल्या माहिती प्रमाणे त्यांची संपत्ती फक्त 26 हजार कोटी रुपये आहे आणि त्यांचे शिक्षण फक्त 9 पर्यंत झालेले आहे. ते सुध्दा नरेंद्र मोदीसारखे शिक्षणापेक्षा अत्यंत कठोर मेहनत करण्यामध्ये विश्र्वास करतात.


या मुलाखतीत नरेंद्र मोदी सांगतात पहिल्यावेळेस लोक मला ओळखायचा प्रयत्न करत होते आणि मी सुध्दा दिल्ली समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. निखिल कामतने पिपल विथ प्रायमिस्टर या त्यांच्या डब्ल्यूटीएफ कंपनीच्या माध्यमातून मुलाखत घेतलेली आहे. सन 2019 मध्ये सुध्दा पंतप्रधान निवासामध्ये नरेंद्र मोदी यांनी अक्षयकुमार या सिनेअभिनेत्याला मुलाखत दिली होती. त्यांचेही शिक्षण कामतसारखेच आहे. त्यावेळी अक्षयकुमारने प्रश्न विचारला होता की, तुम्ही आंबा चोळून खाता की, कापून खाता म्हणजे नरेंद्र मोदींना वाटेल की पत्रकारीता करून घ्यायची आहे तर त्यांच्याकडे अक्षयकुमार, निखिल कामतसारखी मंडळी उभीच आहे. आता तर 5 वी पास व्यक्तींनी सुध्दा नरेंद्र मोदींची मुलाखत घेण्यासाठी अर्ज करण्यास काही हरकत नाही.

निखिल कामतच्या मुलाखतीवर राकेश कायसत हे व्यक्ती कॉमेंट करतात की, पुढे कधी भारताचा ईतिहास लिहिला जाईल त्यावेळेस सन 2025 मध्ये भारतीय एवढे प्रगत होते की, आपल्या मनोरंजनासाठी ते पंतप्रधान ठेवत होते असे लिहिले जाईल. आजच्या परिस्थितीत पैशांच्या जोरावर भारताच्या 140 कोटी लोकांना मुर्ख बनवून विदुशकांचा गट लोकशाहीचे धडे देत आहे. ही या देशाची दुर्देवी अवस्था आहे.
सोर्स:-आर्टीकल-19 , नविनकुमार. सोबत लिंक जोडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!