माळटेकडी उड्डाण पुलाच्या शेजारी दररोज गुलाम पडत आहे

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी जवळील उड्डाणपुलाच्या पलिकडच्या बाजूकडे दररोज गुलाम पडत आहे. पण हा गुलाम कोणाला दिसत नाही. याचे कारण पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप हे गेल्या 10 डिसेंबर पासून परभणीमध्ये असल्यामुळे बहुदा हा गुलाम कोणाच्या नजरेत पडला नाही किंबहुना त्या गुलामाकडे कानाडोळा केला जात आहे.
10 डिसेंबर 2024 पासून परभणी येथे उद्‌भवलेल्या परिस्थितीला हाताळण्यासाठी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप हे सध्या आजपर्यंतही परभणीतच आहेत. तेथे असलेले पोलीस अधिक्षक हे कोणत्या तरी प्रशिक्षणासाठी गेलेले आहेत आणि अपर पोलीस अधिक्षक दत्तात्रय काळे यांच्याकडे पोलीस अधिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार पण आहे. यामुळे शहाजी उमाप यांचे लक्ष परभणीवर जास्त आहे. याच संधीचा फायदा घेवून जुगार चालविणाऱ्या काही महाभागांनी एका मोठ्या फार्महाऊसवर जुगार अड्डा सुरू केला. हा जुगार अड्डा चालविणाऱ्या लोकांनी जुगार खेळण्यासाठी येणाऱ्यांच्या वाहनतळाची सोय माळटेकडी उड्डाणपुलाखाली केली आहे. जुगार हा एक चांगला विषय आहे. महाभारतापासून जुगाराचे वास्तव्य ऐकायला मिळते आणि आज कलयुगात सुध्दा हा जुगाराचा प्रकार अत्यंत जोरदारपणे सुरू आहे. अनेक लोकांना यामुळे रोजगार मिळतो, अनेकांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न सुटतो. अनेकांचे कुटूंब याचमुळे चालते.
जिल्ह्यात घडलेल्या कोणत्याही गुन्ह्याचे समांतर तपास करण्याचा अधिकार त्या-त्या जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेकडे असतो. परंतू या माळटेकडीजवळील गुलामाकडेक लक्ष देण्यासाठी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेला वेळ आहे असे दिसत नाही. त्यांच्याकडे तर नव्यानेच मोठ-मोठे धुरंधर बोलावण्यात आलेले आहेत. ते धुरंधर स्थानिक गुन्हा शाखेत काम करण्याऐवजी दुसऱ्यांची सेवा करण्यात मस्त आहेत आणि स्थानिक गुन्हा शाखेकडे भिंत बदललेल्या लोकांशिवाय पर्याय नाही.
अशाच पध्दतीने जिल्ह्यात सुरू असलेल्या मटका या जुगाराला अत्यंत जोरदारपणे विरोध झाला होता. खरे तर शहाजी उमाप आल्यानंतर त्यांना विशेष पध्दतीने त्या मटकाबुक्कीतून उचलून आणले जात होते आणि त्यांचा हिशोब उत्तम केला जात होता. पण आता मात्र फक्त कॉल करून माणुस आणि काही पैसे बोलवले जात आहेत आणि त्यांच्यावर गुुन्हे दाखल करून आम्ही कार्यवाही केली असे दाखविण्याचा प्रकार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!