नांदेड – नायगाव (खै.) तालुक्यातील मौ. मेळगाव, सांवगी, धनज परिसरातील सन 2019-2020 मधील 4304.98 ब्रास तसेच सन 2019 मधील मौ. ईज्जतगाव (बु.) येथील 700.00 ब्रास असे एकुण 5004.98 ब्रास अवैध उत्खननातून जप्त करण्यात आले होते. या रेतीसाठ्याचा लिलाव 600 रुपये या दराने उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय नायगांव (खै.) येथे बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वा. ठेवण्यात आला आहे. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी यात भाग घ्यावे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय नायगांव (खै.) च्या नोटिस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे तहसिलदार नायगांव (खै.) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
More Related Articles
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळानी सहभागी होण्याचे आवाहन
· स्पर्धेत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट · राज्यातून एकूण 44 सार्वजनिक गणेश…
26 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शंखनाद सभा-खा.अशोक चव्हाण
नांदेड(प्रतिनिधी)- भारताचे गृहमंत्री अमित शाह हे नागपूर-नांदेड अशा तिन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून 26…
नांदेड महापालिकेने जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी– प्रकाश मारावार
नांदेड –महापालिकेने जनतेच्या पैशाची उधळपट्टी तात्काळ थांबावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश…
