भाग्यनगर पोलीसांनी एका चोरट्याला पकडून 1 लाख 48 हजार 200 रुपये किंमतीचे सोन्याचे साहित्य जप्त केले

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी 30 ऑक्टोबर रोजी घडलेल्या एका चैन स्नॅचिंग प्रकरणातील एका पकडून त्याच्याकडून 1 लाख 48 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.30 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास आठवडी बाजारातून भाजी खरेदी करून घराकडे जाणाऱ्या अनिता राजू भुसा यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यानी तोडले होते. याबाबत भाग्यनगर येथील पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक कोंडीबा केजगिर, पोलीस अंमलदार गजानन किडे, विशाल माळवे, हनवता कदम, अदनान पठाण यांनी अमन किशोर जोगदंड (23) रा.विष्णुनगर पण ह.मु.कारगिलनगर विरार जि.पालघर यास ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने आणि त्याचा साथीदार रोहण अंबादास गायकवाड उर्फ पी.के.या दोघांनी मिळून आठवडी बाजार करून घरी जाणाऱ्या महिलेचे गंठण तोडले होते.सोबतच त्याने गल्लीत फुले तोडणाऱ्या दुसऱ्या एका महिलेचे गंठण तोडले होते. त्याप्रमाणे भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 546 आणि 579 असे दोन गुन्हे प्रलंबित होते. या प्रकरणी दोन्ही गुन्ह्यात मिळून भाग्यनगर पोलीसांनी एक सोन्याचे मिनीगंठण 17 ग्रॅम वजनाचे किंमत 1 लाख 4 हजार 700 रुपये आणि 7.4 मिली ग्रॅम वजनाचा चैनचा तुकडा किंमत 43 हजार 500 रुपये असा एकूण 1 लाख 48 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार,अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका यांनी भाग्यनगर पोलीसांचे या उत्कृष्ट कामगिरीसाठी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!