15 नोव्हेंबर रोजी भिम महोत्सवाचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त दि.15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नांदेड शहरातील कुसूम सभागृहात भिम महोत्सवाचे आयोजन करण्यातज आले आहे. या कार्यक्रमात प्रतिकुल परिस्थितीत आपल्या पाल्यांना उच्चशिक्षण देवून सन्मानाने जीवन जगण्याचा धडा दिलेल्या पालकांचा आदर्श पालक पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक प्रा.प्रबुध्द रमेश चित्ते यांनी केले आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 15 नोव्हेंबर रोजी शाळा प्रवेश केला होता. त्या विशेष दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. प्रा.प्रबुध्द रमेश चित्ते यांनी या दिवशी भिम महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटक महापारेषण कंपनीचे माजी अधिक्षक अभियंता इंजि.मिलिंद बनसोडे हे आहेत. आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. या कार्यक्रमात माजी सहसचिव ग्राम विकास मंत्रालय एकनाथ (अनिल) मोरे, स्वारातीमचे उपकुलसचिव डॉ.रवि सरोदे, प्रसिध्द उद्योजक बालाजी ईबितदार, स्वारातीम मधील संशोधक डॉ.भास्कर दवणे, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.गौतम दुथडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ.दिनेश यशवंतराव निखाते हे आहेत.
या प्रसंगी बाबा का जागले…? काय रडले..?? हे महानाट्य सुध्दा सादर केले जाणार आहे. या कार्यक्रमाला जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रतिकुल परिस्थितीत आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देवून सन्मानाने जीवन जगण्याचे धडे दिले त्या पालकांना आदर्श पालक पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिगंबर मोरे, भरतकुमार कानिंदे, इंजि.अशोक गायकवाड, सम्राट हाटकर, ऍड.मंगेश वाघमारे, अशोक कांबळे, राज गोडबोले, गणपत गायकवाड, शेषेराव वाघमारे, मुरलीधर हंबर्डे, नितीन एंगडे, इंजि.अश्र्विन सरोदे, संकेत जमदाडे, विश्र्वजित शुरकांबळे, इंजि.प्रशिक चित्ते, राहुल खंडेलोटे, निखील गायकवाड, इंजि.योगेश लाठकर, सुशिल चौदंते, मनोज भरणे, अतुल गवारे, नागराज भद्रे, अतुल ढगे, सिध्दांत सरोदे, शुभम कंधारे, भिमसेन पांगरेकर, हर्षवर्धन लोकडे, योगेश कोकाटे, तक्षक मल्हारे, हर्षद सरोदे, ऋषीकेश खंदारे मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!