नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी ऍटोमध्ये एका प्रवाशाने विसरलेली 2 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग काही तासात शोधून त्यांना परत केली याबद्दल पोलीसांचे कौतुक होत आहे.
दि.6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती चौक येथे राहणारे श्रीकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी रेल्वे स्टेशन नांदेड ते छत्रपती चौक असा प्रवास ऍटोमध्ये करून छत्रपती चौकात उतरले. पण आपली बॅंग ऍटोतच विसरले. ही बाब लक्षात येताच त्यांनी त्वरीत पोलीस स्टेशन भाग्यनगर गाठले आणि आपल्यासोबत घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख, पोलीस अंमलदार वाडीया, परिवेक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक शिंदे यांनी त्या ऍटोचा पाठलाग केला तेंव्हा तो ऍटो पुन्हा रेल्वे स्थानक परिसरात येवून थांबवला. पोलीस तेथे आले आणि त्यांनी त्या ऍटोमध्ये विसरलेली श्रीकांत पाटील यांची बॅग घेतली आणि त्यांना दाखवली. श्रीकांत पाटील यांच्या बॅगमध्ये 14 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल 2 लाख 10 हजार रुपयांचे दागिणे, 5 हजार रुपये रोख रक्कम, घराच्या चाब्या, एटीएम कार्ड व इतर कागदपत्रे जशीच्या तशी सापडली. श्रीकांत पाटील यांनी पोलीसांना धन्यवाद देतांना आमच्या जीवनात बसलेला धक्का तुमच्यामुळेच थांबला असे सांगितले.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका आदींनी भाग्यनगर पोलीसांचे कौतुक केले आहे.