सध्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. या कालखंडात पत्रकारांची सुगी असते असे म्हटल्या जाते. आज या प्रक्रियेतील अर्ज छाननी पुर्ण झाली आहे. अर्ज मागे घेण्यासाठीची तारीख 4 नोव्हेंबर आहे. या 4 तारखेपर्यंत अपक्ष उमेदवारांची सुध्दा सुगीच असते. काही-काही लोकांना त्यांच्या औकातीपेक्षा जास्त पैसे मिळण्याची संधी असते. तर काही जणांना कोणताही महत्वपुर्ण उमेदवार भाव देत नाही. अशा परिस्थितीत काही- ना काही त्यालाही दिले जाते. अशा प्रकारे प्रकारांच्या सुगीसोबत पुढील पाच दिवस अपक्ष उमेदवारांची सुध्दा सुगीच आहे.
काल परवा मध्य प्रदेशमध्ये आरटीओ कार्यालयाच्या विभागातून दर महा कोणत्या पत्रकाराला किती पैसे दिले जातात या संदर्भाची एक यादी प्रसिध्द झाली. त्यात जवळपास 100 पेक्षा जास्त पत्रकारांची नावे आहेत. मध्य प्रदेशातील विश्लेषक सांगतात या यादीत असणाऱ्या काही नावाविषयी त्यांनाही शंका आहे. याचे कारण सांगतांना विश्लेषक सांगत होते की, त्यांचे घर आम्ही पाहिले आहे, त्यांच्या राहणीमानाची रचना आम्हाला माहित आहे, त्यांच्या पाल्यांकडे काय सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती आहे. मग कोणाकडे पैसे येत असतील तर तो राहणीमान आपले सुधारीलच पैसे कसे आले याला महत्व नाही. पण आहेत तेंव्हा तो व्यक्तील आपल्या राहणीमानाच्रूा दर्जाला उंचावण्यासाठी त्या पैशांचा खर्च करणारच. म्हणजे या पत्रकारांची तर दर महाच सुगी होती.
महाराष्ट्रामध्ये दिवाळी, नवीन वर्ष, वर्धापन दिन या दिवसांना पत्रकारांसाठी सुगीचे दिवस मानले जाते. यंदा दिवाळी आणि विधानसभा निवडणुक एकत्रित आल्यामुळे एकीकडे शासकीय वर्ग पत्रकारांना असा झोला देत आहेत की, आचार संहिता आहे. काही विभाग असा पण झोला देत आहेत की, सर्व काही बंद आहे. मग आम्ही कुठून देणार. तरी पण सध्या निवडणुकीच्या कालखंडात पत्रकारांची काही ना काही भरपाई होईलच आणि त्यांचा उदरनिर्वाह चालविण्या इतरपत पैसे त्यांना येतीलच असो.
पत्रकारांची चर्चा झाली पण निवडणुकांचा जुना अभ्यास केला तर मत पत्रिका होती तेंव्हा सुध्दा ए-4 साईजच्या कागदाच्या आठ घड्या होतील एवढीच मतदान पत्रिका असायची . पुढे ईव्हीएम आले. एका ईव्हीएमवर 18 उमेदवारांची नावे येतात. कुठे-कुठे तर 3-3 ईव्हीएम लावावे लागत आहेत. मतदान पत्रिकेतील उमेदवारांची संख्या आणि आजच्या उमेदवारांची संख्या ही का वाढली? याचा अभ्यास केला तेंव्हा असे लक्षात आले की, मी, माझे कुटूंब, माझे नातलग आणि माझे ऐकणारी मंडळी असा हिशोब जरी केला तर 800-100 मतदानांचा आकडा मुख्य उमेदवारांच्या एकूण गणतीमध्ये कमी होतो. आज सध्याच्या परिस्थितीत एक-एक मतदान महत्वाचे आहे. 1976 मध्ये एका मतामुळे अमेरिकेमध्ये जर्मन भाषेऐवजी इंग्रजी राष्ट्रभाषा बनवली. सन 2008 मध्ये नाथद्वारा या लोकसभा मतदार संघात सी.पी. जोशी यांचा एका मताने पराभव झाला होता आणि त्यातही दुर्देव म्हणजे त्यांच्या गाडी चालकानेच मतदान केले नव्हते. 1923 मध्ये एक मत जास्त मिळाले आणि हिटलर हा नाझी पक्षाचा प्रमुख बनला. 1885 मध्ये एका मताच्या फरकामुळेच फ्रान्समधील राजशाही संपली होती. 1917 मध्ये लोहपुरूष सरदार वल्भभाई पटेल एका मताच्या फरकाने अहमदाबादची निवडणुक हारले होते. 1998 मध्ये एका मताच्या फरकाने अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पडले होते. बहुदा या सर्व बाबींचा अभ्यास ज्यांना असेल त्यांनी मागील तीन-चार निवडणुकांपासून वाढीव संख्येत आलेल्या अपक्ष उमेदवारांना मोदकांचा प्रसाद चढविण्याचा प्रक्रियेला सुरूवात केली. काही-काही लोकांनी तर 1000 ते 5000 मोदकांपेक्षा जास्तचा प्रसाद घेतल्याचा अभिलेख उपलब्ध आहे. मात्र हा अभिलेख काही निवडक लोकांकडे आहे.
यंदा सुध्दा या अपक्ष उमेदवारांची अत्यंत भरीव कामगिरी अर्ज भरण्यामध्ये आहे. त्यात भोकर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. सम्राट होता-होता राहिलेल्या नेत्याचा हा मतदार संघ आहे. म्हणूनच या मतदार संघात अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज भरल्याची संख्या मोठी आहे. भोकर मतदार संघाचे रहिवासी नसलेल्या काही जणांनी या मतदार संघात आपले उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. अशाच प्रकारे नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदार संघामध्ये अशा अपक्ष उमेदवारांची संख्या भरपूर आहे.
आज विधानसभा निवडणुकीच्या अर्जांची छाननी झाली आता पुढील प्रक्रिया नामनिर्देशन परत घेण्याची आहे. त्यासाठी पाच दिवसांचा वेळ शिल्लक आहे. म्हणजे या पाच दिवसांमध्ये आता घोडेबाजार सुरू होईल. या घोडे बाजारात घोड्यातील ताकत अर्थात मतदान घेण्याची ताकत लक्षात घेतली जाईल आणि त्यानुसार त्याचा दर ठरेल. काही लंगडे घोडे सुध्दा यात आपले नशीब आजमावतील. त्या लंगड्या घोड्यांना पुर्ण खुराक मिळाला नाही तरी गवत मात्र नक्की दिले जाईल.आपली अवस्था काय आहे. आपल्या कुटूंबातील लोक आपले ऐकतात काय? याची सुध्दा पुर्ण माहिती नसणाऱ्या अनेकांनी या घोडेबाजारात आपले नशिब आजमावण्यासाठी उतरलेले आहेत. पाहुयात कोणाच्या-नशिबात काय आहे.