ओट भी देंगे, नोट भी देंगे,लढेंगे, जितेंगेच्या घोषणांनी लोहा शहर दणाणले

लोह्यात वंचित बहुजन आघाडीचे शिवा नरंगले यांची ऐतिहासिक रॅली

लोहा,(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीचे लोहा कंधार मतदार संघाचे उमेदवार शिवा नंरंगले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीतील ओट भी देंगे, नोट भी देंगे, लढेंगे, जितेंगे या घोषणाने लोहा शहर दणाणून गेले.

लोहा कंधार मतदारसंघाच्या इतिहासात ही आजपर्यंतची ऐतिहासिक रॅली मानली जात आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 2019 च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार शिवा नरंगले यांनाच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळीही उमेदवारी बहाल केली.

मतदारसंघात असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि जनमानसात असलेली त्यांची प्रतिमा याबरोबरच वंचित बहुजन आघाडीच्या कार्याला वाहून घेतलेला कार्यकर्ता म्हणून शिवा नरंगले मतदारसंघातच नव्हेतर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. बदलत्या राजकारणात नवे समीकरणे निर्माण झाले. महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारणात सरळ सरळ दोन फळ्या निर्माण झाले आहेत. लोहा कंधार मतदार संघातही याचा थेट परिणाम पाहायला मिळाला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेला ओबीसी समाज त्यामुळे इथे ओबीसी आमदार होऊ शकतो. ही कुन कून लागल्याने अनेक जणांनी वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या ताकदीने उमेदवारी मागितली होती. परंतु वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यालाच प्राधान्य देत व त्यांची या मतदारसंघातील लोकप्रियता पाहून शिवा नरंगले यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. आज सकाळी दहा वाजता पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून लोहा येथे असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकापासून वंचित बहुजन आघाडीच्या महाकाय रॅलीची सुरुवात करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ! बाळासाहेब आगे बढो,! शिवाभाऊ आगे बढो! याबरोबरच ओट भी देंगे, नोट भी देंगे आणि लढेंगे, जितेंगे या गगनभेदी घोषणांनी लोहा शहर दणाणून गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास शिवा नरंगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र सदस्य अक्षय बनसोडे, ओबीसी नेते माऊली गीते, वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा महासचिव शाम कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष धीरज हाके, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश गजभारे, भीमराव बेंद्रीकर, रवी पंडित, प्रवक्ते संजय टिके, संघटक डॉ. राम वनंजे, शंकर महाजन, जालिंदर महाराज कागणे, नांदेड,महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, नांदेड तालुका अध्यक्ष विनायक गजभारे, महानगर महासचिव अमृत नरंगलकर, अशोक मल्हारे, महिला जिल्हाध्यक्ष दैवशाला पांचाळ, महासचिव सुनंदा भोसिकर, सोनिया पारडे , गंगासागर दिग्रसकर, शितल सोनकांबळे, प्रमिलाताई नरंगले, संगीता भद्रे, कौशल्याताई रणवीर, तालुका अध्यक्ष प्रमोद धुतमल, कंधार तालुकाध्यक्ष संतोष गवारे ओम साखरे, अमोल तेलंग, मोहसीन बागवान, संतोष केंद्रे, ऋतिक जोंधळे, सचिन बलोरे, रुपेश कांबळे, भास्कर कदम, मनोज जमदाडे यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!