नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसासोबत हदगाव येथील शेख अजीम शेख रजा या युवकाने झटापट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार साहेबराव मनोहरराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 ऑक्टोबरच्या सायंकाळी 5.50 वाजेच्यासुमारास सरकारी दवाखाना पाठीमागील गेटजवळ मला का पकडले म्हणून त्याने साहेबराव कदम सोबत हुज्जत घालून झटापट केली. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या शेख अजीम शेख पाशा विरुध्द नांदेड शहरातील वजिराबाद पोलीसांनी 132, 221(1), 351(3) नुसार गुन्हा क्रमांक 508/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक बिक्कड यांच्याकडे देण्यात आला आहे. हदगाव शहरातील रजानगर हा भाग गुटखा व्यवसायीकांचा केंद्र आहे. या भागात गुटखा माफिया बऱ्याच मोठ्या प्रमाणात वावरतात आणि या भागातूनच गुट्ख्याचा व्यवसाय चालतो अशी खात्रीलायक माहिती हदगाव येथून मिळाली आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,816 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation किनवट येथे दोन घरफोडून 5 लाखांची चोरी महिलेने महिलेला खंडणीसाठी केला फोन