नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेला फोन करून दुसऱ्या महिलेने तुझ्या नवऱ्याने मला 50 हजार रुपये द्यावेत नाही तर मोबाईलवरील चॅटींग नातलगांकडे आणि सोशल मिडीयावर व्हायरल करते अशी धमकी देणाऱ्या महिले विरुध्द इतवारा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद याकुब हाजी सलीम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 ऑक्टोबरला सकाळी 10 ते 10.30 वाजेदरम्यान त्यांच्या पत्नी सहिदा बानु यांना फोन करून सजिदा बानु या महिलेने सांगितले की, तुझ्या नवऱ्याने मला दरमहा 50 हजार रुपये दिले तर ठिक नाही तर मोबाईलवरचे चॅटींग नातलगांकडे आणि सोशल मिडीयावर व्हायरल करेल अशी धमकी देवून खंडणीची मागणी केली. इतवारा पोलीसांनी या घटनेला भारतीय न्याय संहितेच्या कलम 308(2) नुसार गुन्हा क्रमांक 378/2024 दाखल केला आहे. इतवाराचे पोलीस अंमलदार मजाज अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,503 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्थागुशाच्या पोलीसासोबत झटापट 2 लाख 75 हजारांची जबरी चोरी ; 1 लाख 17 हजारांची 500 रुपयांची घरफोडी