नांदेड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन सेना जिल्हा नांदेडची संघटना बांधणी, समीक्षा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिपब्लिकन सेना व समविचारी संघटनेच्यावतीने शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आज दि. 22 सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली.
या बैठकीत संघटनात्मक बांधणी व समीक्षा तसेच आगामी निवडणूक कार्यक्रमाबाबत रणनिती आदीं विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढणे तसेच लोकसभा पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सचिव माधव जमधाडे, जिल्हाध्यक्ष (उत्तर नांदेड) प्रा. राजू सोनसळे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस अनिल सिरसे, रवी हाडसे, प्रशांत गोडबोले, मास मूव्हमेंटचे प्रतीक मोरे, बहुजन लोकन्याय संघाचे राहुल चिखलीकर, सय्यद इलयास पाशा राजूरकर,ऍड. सुमंत लाटकर, मधुकर झगडे, शंकर थोरात, अकबर खान पठाण, बहुजन पँथरचे भीमराव बुक्तरे, अंकुश सावते, प्रेमीला वाघमारे, ममता खोब्रागडे, रंजना वासनिक, प्रा. अश्विन गर्दनमारे, राज घंटेवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.