नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना व बेकायदेशीरपणे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका हायवा टिप्परवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत चालकाला ताब्यात घेण्यात आले असून ४५ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रचला सापळा दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १५:३० वाजेच्या सुमारास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे विशेष शोध पथक ढवळे कॉर्नर सिडको परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी जुन्या दूध डेअरी कडून वसरणी साईबाबा कमानकडे एका हायवा वाहनातून अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ दोन पंचांना सोबत घेऊन जुने एअरपोर्ट चौक वसरणी येथे सापळा रचला. पाठलाग करून हायवा रोखला रेतीने भरलेला हायवा वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून महात्मा फुले चौक, वसरणी येथे रस्त्यावर त्याला रोखले. वाहनाची पाहणी करून विचारपूस केली असता, चालक पंडित जळबा गीरे, वय ४३ वर्षे, राहणार झर, तालुका लोहा, जिल्हा नांदेड याच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही कायदेशीर परवाना आढळला नाही. ४५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत पोलीस पथकाने पंचांसमक्ष जागेवरच जप्ती पंचनामा करून खालील मुद्देमाल जप्त केला आहे: TATA कंपनीचा हायवा टिप्पर, क्रमांक MH 26 CT 7909, निळ्या रंगाची बॉडी व पांढरा कॅबिन – किंमत रु. ४५,००,०००/- हायवामधील ५ ब्रास रेती – किंमत रु. २५,०००/- एकूण जप्त मुद्देमाल – रु. ४५,२५,०००/- कठोर कलमांन्वये गुन्हा दाखल या प्रकरणी पोलीस अंमलदार हनुमंत रामराव तेलंग, बकल नंबर २१५९ यांच्या फिर्यादीवरून आरोपी चालक पंडित जळबा गीरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ उपकलम २ आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ उपकलम ७ व ८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नितीन मालोजी मुसळे करत आहेत. बारकोडचा नवा खेळ नांदेड ग्रामीण पोलिसांनी या गाडीवर गुन्हा दाखल कसा केला. यावर बातमी लिहिली ते मोठे अजब रामायण लिहावे लागेल. परंतु गाडी क्रमांक एम.एच. २६ सीटी ७९०९ असलेला बारकोड मोठा अजब आहे.महसूल विभागाने व लाईन निर्गमित केलेला हा बारकोड २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.२४ वाजता निर्गमित केला आहे.त्यावर हि गाडी हिंगणघाट वर्धा कडे ४ ब्रास वाळू घेऊन जाणार आहे असे नमूद आहे. तसेच त्याला त्यासाठी २५ नोव्हेंबरच्या सकाळी ९.३० वाजता निघून हिंगणघाट येथे पोहचण्यासाठी २६ नोव्हेंबर २०२६ च्या दुपारी १२.२० वाजे पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. मग हि गाडी साईबाबा कमान कडे आलीच कश्याला. दुसऱ्या बारकोडचा खेळ याच बारकोड मध्ये वाहन क्रमांक एमएच ०४ एचवाय ५०७१ ची नोंद सुद्धा आहे. हि गाडी २२ ब्रास वाळू घेऊन २ ३नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६.१० वाजता निघाली होती तिला सटाणा नासिकला त्याच दिवशी दुपारी ४.२१ वाजता पोहचायचे होते. या मध्ये हिंगणघाटचा रस्ता २८७ किमी आहे. त्यासाठी १५ तासांचा वेळ देण्यात आलं आहे. तर सटाणा नासिक हे अंतर ४४८ किमी आहे. त्यातील फरक वाचकांनी पहायला हवा. सोबतच बारकोड निर्गमित कधी झाला,नांदेडला पकडलेली गाडी कधी पकडली.बारकोड निर्गमित कधी आणि केव्हा झाला. वाचकांनी त्याची बारकाईने पाहणी केली तर या बारकोड मध्ये सुद्धा अनेक घोटाळे करण्यास मोठा वाव वाव स्पष्ट दिसतो. महाराष्ट सरकार बारकोड वरून गौण खनिज चोरीवर फास आवळणार आहे अश्या वलग्ना करीत आहे. Kanthak Suryatal Post Views: 5 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दरमहा २५ हजार लोकांचा बळी थांबवा! पुतिन यांच्या महाकाय पाणबुडी मोहिमेवर डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य!