नांदेड (प्रतिनिधी) – दिवाळीचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगार आणि पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन व बोनस मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठवाडा नगरपालिका, महानगरपालिका कामगार-कर्मचारी युनियन (लालबावटा) संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, दिवाळीपूर्वी वेतन व बोनस अदा करण्यासह प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, अन्यथा शुक्रवार, ६ नोव्हेंबरपासून महापालिका कार्यालयासमोर बेमुदत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात संघटनेचे कार्याध्यक्ष ऍड.. कॉ. प्रदीप नागापूरकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. 6 फेब्रुवारी रोजी अतिरिक्त आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आश्वासन देण्यात आले होते. तसेच ५5 फेब्रुवारी, २22२ जुलै आणि 30३० ऑक्टोबर २2026०२६ रोजी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, अद्याप या मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागातील कंत्राटी सफाई कामगार तसेच पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि बोनस देणे अपेक्षित असताना प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सणासुदीच्या काळातही कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.दिवाळीपूर्वी वेतन व बोनस अदा करणे आणि यापूर्वी सादर केलेल्या निवेदनातील इतर प्रलंबित मागण्यांना तातडीने मंजुरी देऊन त्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास 6६ नोव्हेंबरपासून महापालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच अमृत इंटरप्रायजेसचे मालक व व्यवस्थापक यांना पाठविण्यात आल्या आहेत. Kanthak Suryatal Post Views: 7 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जेलमध्ये टाका किंवा एफआयआर करा, मी पुन्हा लिहिणार! दिल्ली पोलिसांच्या गाडीवर बॅन आरएसएस लिहिणारी ती मुलगी नक्की कोण?