नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 ऑक्टोबर रोजी हिंगोली उड्डाणपुलाजवळ असलेल्या खालसा फायनान्सच्या कार्यालयामध्ये चंद्रकांत दगडूजी शिंदे (40) या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर या प्रकरणी अपहरण करणे, डांबून ठेवने, खून करणे या सदराखाली वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दोन दिवसापुर्वी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक(एसआयटी) तयार करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी दिल्यानंतर तपास पथकाने आज अगोदर पकडलेले सहा आणि काल पकडलेले 3 अशा नऊ जणांना न्यायालयासमक्ष हजर केले. यातील काही जणांना मुख्य न्यायदंडाधिकारी भाऊसाहेब मोरे यांनी चार दिवस तर काही जणांना दोन दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे. विशेष तपास पथकातील पोलीस उपअधिक्षक रामेश्र्वर वेंजने यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी महाजन, विठ्ठल दुरपडे, पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड आणि त्यांच्यास सहकारी पोलीस अंमलदारांनी काल पकडलेले फायनान्स चालकचे अध्यक्ष हरप्रितसिंघ उर्फ मंटू नरेंद्रसिंघ मेजर (40), सतपालसिंघ किशनसिंघ खालसा (47) आणि परभणी येथील शेख शोएब शेख महेमुद (21) या तिघांबद्दल न्यायालयासमक्ष सरकारी वकील ऍड. के.एम.पठ्ठेबहादुर आणि पोलीस उपअधिक्षक रामेश्र्वर वेंजने यांनी न्यायालयासमक्ष सांगितले की, फायनान्स कंपनीतील सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त केले आहेत. सोबतच यापुर्वी अटक केलेल्या लोकांकडून काय-काय तपास केला याचे सविस्तर सादरीकरण केले. या प्रकरणात यापुर्वी सुध्दा काही लोकांना बळजबरीने उचलून आणून डांबून ठेवले होते काय? हे तपास करणे आहे. कर्जदारांकडून घेतलेले कोरे बॉन्ड पेपर, कोरे धनादेश आणि इतर कागदपत्र कोठे लपवले आहेत. याचा तपास करणे आहे. दुग्गर फायनान्स या कार्यालयात 500 रुपये दराच्या चलनी नोटा सारख्या दिसणाऱ्या नोटा मोठ्या प्रमाणात मिळाल्या आहेत. त्याचा उद्देश काय आहे हे तपासणे आहे. काही आरोपींच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या रेकॉर्डींगची जुळणी करण्यासाठी व्हाईस सॅम्पल घेणे आहे. या तीन जणांना मुख्य न्यायादंडाधिकाऱ्यांनी 2 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्थात चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. यापुर्वी पकडलेले सहा जण जयकुमार उर्फ शेरा भगवान गायकवाड (21), शेख आमेर शेख हुसेन(23), इमरान खान शाहबाज खान(40), शेख मुदस्सीर शेख कदीर(24), शेख अहेमद उर्फ आसलम मो. बशीर(38) आणि सुमेध शेकोजीराव डोईबळे(21) यांच्याबद्दल सादरीकरण केले की, आता मुख्य आरोपीपकडे आहेत म्हणून सर्वांचा एकत्रीत तपास होणे आवश्यक आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी भाऊसाहेब मोरे यांनी या सहा जणांना दोन दिवस अर्थात 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढीव पोलीस कोठडीत पाठविले आहे. Kanthak Suryatal Post Views: 45 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तरुणांनो आता पेटून उठा – राज ठाकरे नांदेडमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह १ लाख २३ हजारांचा ऐवज लंपास